JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घरातली माणसं सुद्धा बोलत नव्हती पण तृतीयपंथीय माईने करून दाखवलं! एका बिझनेस वुमनची STORY

घरातली माणसं सुद्धा बोलत नव्हती पण तृतीयपंथीय माईने करून दाखवलं! एका बिझनेस वुमनची STORY

सर्व अडचणींचा सामना करत पुण्यातील एका तृतीयपंथीयानं स्वत:चा व्यवसाय सुरू केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 26 जुलै :  तृतीयपंथीयांना समाजामध्ये वावरताना अनेकदा अपमानस्पद वागणुकीला तोंड द्यावं लागतं. बऱ्याच जणांना जगण्यासाठी लोकांसमोर हात पसरावे लागतात. व्यवसाय आणि नोकरीमध्ये त्यांना संधी मिळत नाही. या सर्व अडचणींचा सामना करत पुण्यातील एका तृतीयपंथीयानं स्वत:चा व्यवसाय सुरू केलाय. त्यांचा हा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. कसा केला संघर्ष? पुण्यातील माई या तृतीयपंथीयानं मंडईमध्ये लेडीज वेअर दुकान सुरू केलंय. समाजाची चौकट बदलण्याची जिद्द मनाशी असलेल्या त्यांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पण, त्यांचा प्रवास सहज झालेला नाही. त्या मुळच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या आहेत. आपण तृतीयपंथी आहोत हे सत्य समजल्यानंतर त्यांना घुसमट होऊ लागली.

त्यांनी आपलं सत्य सर्वप्रथम भावंडांना सांगितलं. त्यांनी पहिल्यांना अबोला धरला, पण नंतर स्विकारलं. ग्रॅच्युएशनपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर पुण्यामध्ये त्या सरकारी संस्थेचा डिप्लोमा करण्यासाठी आल्या होत्या. पुण्यात तृतीयपंथी कम्युनिटीमध्ये गुरू-शिष्य परंपरा असते, असे त्यांना समजले. सुरुवातीला बराच संघर्ष करावा लागला. इतर तृतीयपंथीयांसारखेच जिणे जगत असताना आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे अशी जिद्द त्या मनाशी बांधून होत्या. परंतु समाजाच्या असहायतेमुळे कुठेही चालना मिळत नव्हती. ज्याच्या शरिराचे लचके तोडले, मृत्यूनंतर त्यांचं काय होतं? बुधवार पेठेतील INSIDE STORY कसा उभा केला व्यवसाय? एकदा माईंनी रिक्षावर एका संस्थेची जाहिरात पाहिली. ही संस्था व्यवसायासाठी मदत करते असे समजल्यानंतर त्यांनी या संस्थेमार्फत व्यवसायासाठी अर्ज केला. व्यवसायासाठी जागा शोधण्यासाठी अडचणी आल्या. मंडईमध्ये राहणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीनं जागा मिळवून दिली. तुळशीबागेतल्या दुकानदारांनी व्यवसायासाठी मदत केली.  एका तृतीयपंथीयाने दुकान सुरू केले आहे याचे अप्रूप वाटून सुरुवातीला त्यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे माऊथ-पब्लिसिटीमुळे त्यांचे दुकान सुरळीत चालू लागले. ‘समाजाकडून मिळणाऱ्या हीन वागणुकीमुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मी माझ्या जिद्दीच्या जोरावर व्यवसाय उभा करो शकले. परंतु माझ्यासारख्या अनेकांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समाजाने समजूतदारपणाची भूमिका घ्यायला हवी,’ अशी अपेक्षा माईंनी व्यक्त केलीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या