अंजीर प्रमाणे दिसणारं जंगली फळं अनेक आजारांवर आहे गुणकारी, जाणून घ्या त्याचे फायदे
आहारात भाज्यांइतकंच फळांचंही खूप महत्त्व आहे. ऋतुमानानुसार पिकणारी फळं आवर्जून खावीत असं डॉक्टरही सांगतात. फळांमुळे अनेक जीवनसत्त्व ,भरपूर पाणी आणि फायबर शरीराला मिळत असतं. उन्हाळ्यात येणारं प्रमुख फळ आंबा असलं, तरी आणखीही काही फळं उन्हाळ्यात पिकतात. त्यापैकीच एक आहे तिमला. उत्तराखंडच्या डोंगरदऱ्यात ‘तिमला’ नावाचं एक फळ मिळतं. ते अंजिराच्या कुळातलं आहे. तिमला ही अंजिराचीच एक जंगली प्रजात आहे. आरोग्यासाठी अंजीर अतिशय पौष्टिक फळ समजलं जातं. अनेक आजारांवर अंजीर खाल्ल्यामुळे आराम पडतो. उत्तराखंडच्या पर्वतीय प्रदेशात तिमल, तिमिल, तिमलू अशा नावानं हे फळ ओळखलं जातं. त्या भागात हे फळ मोठ्या प्रमाणावर मिळतं. त्याचे औषधी उपयोगही आहेत. हल्द्वानीमधील ज्येष्ठ आयुर्वेदिय तज्ज्ञ डॉ. विनय खुल्लर यांच्या मते, अंजिरामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, जीवनसत्त्व अ आणि ब ही पोषणमूल्यं असतात. कच्च्या अंजीराची भाजी किंवा लोणचं तयार केलं जातं. या भागात एप्रिल ते जून महिन्यापर्यंत अंजिरं मिळतात. हिरवट रंगाचं अंजीर पिवळट, लाल झालं, की ते पिकलं असं समजतात. पिकलेलं अंजीर खूप गोड लागतं. उत्तराखंडमधल्या डोंगराळ भागात अंजिराची भाजी, रायतं हे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. अंजीर पचनक्रिया सुधारण्यासाठीही उत्तम समजलं जातं.
अंजिराच्या झाडाची उंची साधारणपणे 800 ते 2200 मीटर असते. त्याची पानं 20 ते 25 सेंटिमीटर आकाराची असतात. त्यांचा वापर गायी-म्हशींना चारा म्हणून केला जातो. यामुळे दुभत्या जनावरांचं दूध वाढतं, असं नैनिताल जिल्ह्यातले कंचन सिंह कुंवर यांचं म्हणणं आहे. तिमला या फळात औषधी गुणधर्म असतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस रिव्ह्यू अँड रिसर्च या शोधनिबंधात त्याबाबत माहिती प्रसिद्ध झाल्याचं डॉ. विनय खुल्लर यांनी सांगितलं. आंबा आणि सफरचंद या फळांच्या तुलनेत अंजिरामध्ये फॅट्स, प्रोटीन्स, फायबर आणि खनिजांचं प्रमाण जास्त असल्याचं त्यात म्हटलंय. अंजिरात 83 टक्के शर्करा असल्यानं त्याला जगातलं सगळ्यात गोड फळ समजलं जातं. असं असलं तरी डायबेटीसच्या रुग्णांना अंजीर खाण्याचे काही खास फायदे मिळतात. अंजीर हे फळ पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे डायबेटीस आणि रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. डॉ. खुल्लर यांच्या मते, अंजिरात जिवाणूनाशक गुण असलेलं फिनॉलिक तत्त्व असतं. त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातले विषारी घटक दूर करण्यास मदत करतात. अंजिराच्या झाडाला धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडाइतकंच ते पवित्र मानलं जातं. याच्या पानांपासून पत्रावळी बनवल्या जातात. श्राद्धावेळी पितरांसाठी याच पत्रावळीत पदार्थ वाढण्याची पद्धत एके काळी होती. सध्या विविध पानं किंवा प्लास्टिक, कागद यांचाही वापर करून पत्रावळी तयार होतात. अंजिराच्या झाडाच्या पानांचा उपयोग काही पूजांमध्ये केला जातो. अंजिराचं झाड बहुउपयोगी समजलं जातं.