JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घरात सजावटीसाठी वापरलं जाणारं हे रोपटं कोरोनाचा करेल खात्मा; संशोधकांनी शोधला नवीन उपाय

घरात सजावटीसाठी वापरलं जाणारं हे रोपटं कोरोनाचा करेल खात्मा; संशोधकांनी शोधला नवीन उपाय

संशोधनात सांगितलंय की, घरांमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या एका वनस्पतीद्वारे कोविड-19 विषाणूला रोखता येतं. कोविड-19 विषाणूमुळं शरीरात येणारी सूज रोखण्यासाठी ही वनस्पती प्रभावी ठरू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : कोविड-19 विषाणूपासून बचावासाठी आणि त्याचा धोका कमी करण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत. ज्यामध्ये सामाजिक अंतर, लसीकरण, प्रतिकारशक्ती वाढवणे, वेळोवेळी हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणं इत्यादी गोष्टी प्रमुख आहेत. याशिवाय, कोरोनाच्या डेल्टा, ओमिक्रॉन आणि इतर उपप्रकारांविरूद्ध प्रतिपिंडं विकसित करून महामारी रोखण्याचा प्रयत्न तज्ज्ञ करीत आहेत. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी एका संशोधनात सांगितलंय की, घरांमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या एका वनस्पतीद्वारे कोविड-19 विषाणूला रोखता येतं. कोविड-19 विषाणूमुळं शरीरात येणारी सूज रोखण्यासाठी ही वनस्पती प्रभावी ठरू शकते. कोरोनाच्या स्वस्त आणि सुरक्षित उपचारासाठी यावर अधिक अभ्यास करणं आवश्यक आहे, असं शास्त्रज्ञ म्हणाले. संशोधनात काय सांगितलंय आज तक ने दिलेल्या बातमीनुसार, अँटिऑक्सिडंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असं म्हटलंय की, रोझमेरी वनस्पतीमध्ये आढळणारे कार्नोसिक अ‌ॅसिड कंपाऊंड कोविड-19 स्पाइक प्रोटीन आणि रिसेप्टर प्रोटीन ACE2 यांच्यातील परस्पर क्रियेस प्रतिबंध करू शकते. कोविड-19 विषाणू पेशींना संक्रमित करण्यासाठी स्पाइक प्रथिनं वापरतो आणि ACE2 पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून कार्य करतो. प्राध्यापक आणि ज्येष्ठ लेखक स्टुअर्ट लिप्टन म्हणाले, “आम्हाला वाटतं की कार्नोसिक अ‌ॅसिड किंवा काही संयुगं कोविड-19 आणि इतर काही आजारांवर स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी उपचार म्हणून काम करू शकतात.” रोझमेरी किंवा गुलमेहंदी वनस्पतीमध्ये कार्नोसिक अॅसिड आढळतं, जे औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानलं जातं. अनेक औषधं आणि सौंदर्य उत्पादनं बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे वाचा -  ही आहेत Omicron ची सर्व 14 लक्षणं; सर्वात कमी आणि सर्वात जास्त वेळा दिसलेले Symptoms दीर्घकाळ चाललेल्या कोविडमध्ये देखील हे फायदेशीर 2016 च्या अभ्यासात, लिप्टन आणि त्याच्या शास्त्रज्ञांनी नोंदवलं की, रोझमेरीमध्ये आढळणारं कार्नोसिक अ‌ॅसिड सूज कमी करू शकतं. यासोबतच, त्यांना या संशोधनात काही पुरावेदेखील मिळाले, ज्यात म्हटलंय की, अल्झायमरसारखी लक्षणं देखील कमी होतात, ज्यामध्ये मेंदूला सूज येते. या अभ्यासाच्या आधारे, शास्त्रज्ञांनी सुचवलं आहे की, रोझमेरी COVID-19 मध्ये दिसणार्‍या सूज येण्यावर फायदेशीर ठरू शकते. या व्यतिरिक्त, काही प्रकरणांमध्ये, तो post-COVID-19 सिंड्रोममध्ये देखील ही सूज दिसते, ज्याला लाँग कोविड (Long Covid) म्हणतात. यातही ही वनस्पती फायदेशीर ठरू शकते. यासोबतच ‘ब्रेन फॉग’मध्येही याची मदत होऊ शकते. हे वाचा -  Omicron पेक्षा 30 टक्के जास्त घातक आहे त्याचा हा उपप्रकार; आरोग्य तज्ज्ञांचा गंभीर इशारा अँटीव्हायरल प्रभावामुळे व्हायरस निष्क्रिय होतो संशोधकांना आढळलं की, कार्नोसिक अ‌ॅसिडच्या उच्च डोसमुळं कोविड-19 ची पेशींना संक्रमित करण्याची क्षमता कमी होते. हा विषाणूविरोधी प्रभाव (Anti-Viral Effect) कार्नोसिक अॅ‌सिडमध्ये आढळतो. हे अ‌ॅसिड ACE2 रिसेप्टरला इतकं मजबूत बनवतं, की संसर्ग माणसावर कोणताही परिणाम करू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या