JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अशा कारणांमुळे वाढतो High Blood Pressure चा धोका; या गोष्टींचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी

अशा कारणांमुळे वाढतो High Blood Pressure चा धोका; या गोष्टींचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी

धमन्यांमध्ये रक्ताचा दाब वाढतो तेव्हा हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते, या जास्त दाबाला उच्च रक्तदाब (BP) म्हणतात. सोप्या भाषेत समजून घ्या, सामान्य रक्तदाबाची पातळी 120/80 असते, जेव्हा रक्तदाबाची पातळी यापेक्षा जास्त असते तेव्हा या स्थितीला उच्च रक्तदाब म्हणतात.

जाहिरात

रक्तदाब : प्रोबायोटिक्स रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 मार्च : जर तुम्हाला किंवा कुटुंबातील कोणाला उच्च रक्तदाबाचा ( blood pressure) त्रास असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उच्च रक्तदाबाची समस्या भारतात वेगाने पसरत आहे. या आजाराने भारतातील सुमारे 5 कोटी 70 लाख लोक प्रभावित आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, डोळयातील पडदा खराब होणे आणि मृत्यू देखील (high blood pressure) होतो. उच्च रक्तदाब डॉ. अबरार मुलतानी यांनी ‘ झी न्यूज ’ला दिलेल्या माहितीनुसार, धमन्यांमध्ये रक्ताचा दाब वाढतो तेव्हा हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते, या जास्त दाबाला उच्च रक्तदाब (BP) म्हणतात. सोप्या भाषेत समजून घ्या, सामान्य रक्तदाबाची पातळी 120/80 असते, जेव्हा रक्तदाबाची पातळी यापेक्षा जास्त असते तेव्हा या स्थितीला उच्च रक्तदाब म्हणतात. रक्तदाब वाढल्याची लक्षणे चक्कर येणे, अस्वस्थता, घाम येणे आणि झोप न लागणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे असू शकतात. परंतु, ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. एका संशोधनानुसार, डोळ्यांतील रक्ताचे डाग, ज्याला सबकॉन्जेक्टिव्हल हॅमरेज म्हणतात, हा उच्च रक्तदाबाचा इशारा असू शकतो. रक्तदाब का वाढतो? डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, ब्लड प्रेशर 85 च्या वर जाणे हा धोक्याचा इशारा मानला जातो. बदलती जीवनशैली, ताणतणाव, थकवा आणि खराब आहार ही रक्तदाब वाढण्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. जे लोक आधीच बीपीचे रुग्ण आहेत, त्यांनी जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केले तरी उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. रक्तदाब वाढण्याचे हे देखील एक कारण काही अहवालांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय असणे, धूम्रपान करणे किंवा जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे देखील बीपी वाढण्याचे कारण मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या आजाराचा 99 टक्के उपचार केवळ औषधानेच नाही तर आहारानेही होऊ शकतो. उच्च रक्तदाबामधील आहार 1. लिंबूवर्गीय फळे लिंबूवर्गीय फळे आणि केळी - उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. लिंबूवर्गीय फळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रित राहतो. द्राक्षे, संत्री, लिंबू याशिवाय तुम्ही जेवणात केळीही खाऊ शकता. 2. बीन्स आणि मसूर डाळी या फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे भांडार आहे. अनेक संशोधन अभ्यासांनी ब्लड प्रेशरची पातळी कमी करण्यासाठी बीन्स आणि मसूर खाण्याचे सकारात्मक परिणाम दर्शविले आहेत. त्यामुळे डाळींचा आहारात समावेश करावा. हे वाचा -  रात्री जेवल्यानंतर किमान इतका वेळ तरी चालायला हवं; नंतर आजारांवरील वाचेल खर्च 3. जांबूळ खाणे जांभळामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामध्ये असलेले अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट्स रक्तातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवतात. जांबूळ खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. 4. भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्या खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आर्जिनिन आढळतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. भोपळ्याच्या बिया किंवा भोपळ्याचे तेल तुम्ही जेवणात वापरू शकता. हे वाचा -  सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं यासाठी आहे फायदेशीर 5. फॅटी फिश माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते, त्यामुळे आपले हृदय निरोगी राहते. माशांमध्ये आढळणाऱ्या चरबीमध्ये संयुगे असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि जळजळ कमी होते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. म्हणूनच तुमच्या आहारात फॅटी माशांचा समावेश करावा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या