नवी दिल्ली, 15 डिसेंबर : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. एखादी समस्या फार गंभीर बनल्याशिवाय लोक त्याकडे लक्ष देत नाहीत आणि मग परिस्थिती बिकट बनते. निरोगी व्यक्तीने शारीरीक व्याधी सुरू होण्यापूर्वीच खबरदारी म्हणून काही उपाय करणे फायद्याचे ठरते. व्यायामाच्या (Exercise) अभावासह अनेक कारणे आहेत ज्यामुळे कमी वयात तरुणांनाही (youth health issue increased) अनेक व्याधी होत आहेत. मधुमेह, हृदयाचे विकार तरुण वयात डोके वर काढत असल्यानं चिंता व्यक्त केली (Heart care Tips) जाते. याबाबत झी न्यूजने बातमी प्रसिद्ध केली आहे. 1) व्यायामाचा (Exercise) अभाव - हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगल्या आहारासह योग्य व्यायाम आवश्यक आहे. नियमित शारीरिक हालचाली न केल्यानं हृदयाचे नुकसान होते. फक्त 20 मिनिटे चालणे, धावणे किंवा गेम खेळणे यासारखी कोणतीही क्रिया हृदय निरोगी ठेवते. 2) खाण्याच्या चुकीच्या सवयी - अनहेल्दी आणि प्रक्रिया केलेले पदार्थ (प्रोसेस्ड फूड) खाल्ल्यानेही तुमच्या शरीराचे चांगलेच नुकसान होते. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढू शकते. 3) ताण-तणाव - आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे ताण-तणाव खूप वाढले आहेत. तणावामुळं रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. तणावाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस अलिकडे फार घातक ठरत आहे. हे वाचा - थर्टी फर्स्टला पार्ट्यांना रात्री 12 वाजेपर्यंत असणार परवानगी, पोलिसांकडून नियमावली जाहीर 4) धूम्रपान धूम्रपानाची सवय हृदयाच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. सिगारेटमध्ये कार्बन मोनोऑक्साइड असते. यामुळे ब्लड काऊंट कमी होऊन कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. सार्वजनिक ठिकाणी किंवा घरामध्ये धूम्रपान केल्याने त्याचा इतरांनाही त्रास होतो. त्याच्या धुरामुळे धूम्रपान न करणाऱ्यांच्या आरोग्यालाही हानी पोहचते. हे वाचा - Dreams Signs: अशी स्वप्नं तुम्हालाही पडतात का? भविष्यात भरपूर पैसा मिळण्याचे असे असतात संकेत 5) मद्यपान मद्यपानामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढते. यामध्ये असलेल्या चरबीमुळे कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. सतत मद्यपान केल्यानेही वजन वाढू शकते