उन्हाळी पिकनिकसाठी पर्यटन स्थळं
मुंबई, 2 मे : परदेशात प्रवास न करता उन्हाळ्यात एका उत्तम ट्रिपचा भारतात आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही काही ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी. स्टेव्हिस्टाकडे भारतातील आकर्षक हॉलिडे होम्स आहेत जी तुमच्या दैनंदिन व्यापातून तुम्हाला आराम देतात. तुम्हाला अगदी कसौलीच्या शांत पर्वतरांगापासून ते नाशिकच्या शांत बॅकवॉटरपर्यंत बरेच ऑप्शन्स आहेत. ही घरं तुमच्या सर्व गरजा पूर्ण करतात. तुम्हीही शांत वेळ घालवण्यासाठी काही आरामदायी पर्यायांच्या शोधात असाल तर उन्हाळ्यात परफेक्ट असलेले सात पर्याय आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. व्हिला माउंटन क्रेस्ट, कसौली बाहेरचं नैसर्गिक सौंदर्य दिसेल इतक्या खिडक्या असलेल्या लिव्हिंग रूम तुम्हाला इथे मिळतील. या ग्लासहाउसमधून तुम्ही परिसरातील सौंदर्य पाहू शकता. रूममधील बाल्कनी शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम जागा आहे. तुम्ही गॅझेबो, लॉन किंवा टेरेसवर तुमच्या लोकांसह हँग आउटदेखील करू शकता. फिटनेस फ्रीक्स काही इनडोअर गेम्स खेळण्याव्यतिरिक्त जिम वापरू शकतात किंवा पोहायला जाऊ शकतात. वॉटरमार्क व्हिला, नाशिक वॉटरमार्क व्हिला हे गंगापूर धरणाच्या नयनरम्य बॅकवॉटरच्या मधोमध वसलेले एक शांत वेलनेस रिट्रीट आहे. हे आलिशान फार्म एक अनोखा अनुभव देतं, जो आधुनिक लक्झरी आणि ग्रामीण शेती जीवनाची सांगड घालतो. इथे तुम्ही धरणाच्या शांत बॅकवॉटरचा अनुभव घेऊ शकता. तसंच खासगी पूलामध्ये बराच वेळ पोहू शकता. या ठिकाणी सेंद्रिय भाजीपाल्याच्या बागा आणि प्राणी आहेत. ज्यामध्ये बदकं, कोंबड्या आणि शेळ्यांचा समावेश आहे. हे निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम गेटवे बनवतात. इथल्या सुंदर बागांमध्ये तुम्ही आराम करू शकता आणि इन्स्टाग्रामसाठी परफेक्ट असलेले सनसेट पाहू शकता. वाईन शौकिनांसाठी शहरातील प्रसिद्ध वाईनरी जवळच आहे. सायकलिंग करत तुम्ही तिथे पोहोचू शकता. कोरल आर्क, अलिबाग मुंबईकरांना शहराच्या गजबजलेल्या वातावरणापासून ब्रेक हवा असेल, तर अलिबाग उत्तम ठिकाण आहे. इथं तुम्ही शांततेत वेळ घालवू शकता. इथे कोरल आर्च हा एक आलिशान हॉलिडे व्हिला आहे आणि समुद्रकिनाऱ्यापासून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. 5-एकर प्लॉटमध्ये पसरलेली ही एक आलिशान प्रॉपर्टी खूपच सुंदर आहे. दोन्ही बाजूला पाम वृक्षांनी बांधलेला अर्ध-गोलाकार दर्शनी भाग आहे. जकूझीमध्ये वेळ घालवणं, टेनिस कोर्टवर खेळणं, किंवा फक्त आराम करणं आणि मोठ्या पूलजवळ सूर्यप्रकाशाचा आनंद घेणं, या पैकी काहीही तुम्ही करू शकता. बास्क इन द ग्रीन्स, कूर्ग कूर्गमध्ये शांततेत वसलेलं हे ठिकाण चारही बाजूंनी अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने वेढलेलं आहे, ज्यामुळे ते मित्र, कपल तसंच कुटुंबांसाठी परफेक्ट गेटवे ठरतं. कूर्गमधील या सुंदर घराच्या टेरेसवर जंगल आणि निळ्या आकाशाचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं. या घरामध्ये चार आलिशान बेडरुम्स आहेत, ज्या उत्तम कंफर्ट प्रदान करण्यासाठी तयार केल्या आहेत. त्या खूप सुंदररित्या डिझाईन केल्या आहेत. तुम्ही निसर्गरम्य वातावरण आणि ताजी हवा घेऊ शकता. तसंच सुंदर गॅझेबोवर आराम करू शकता किंवा टेरेसवर ड्रिंक घेत बसू शकता. या घरात प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. इथला लाउंज एरिया, उत्तम डिझाईन केलेले इंटिरिअर्स आणि मोठ्या विस्तीर्ण लॉनसह बास्क इन द ग्रीन्स हे तुमच्या मित्रांसह किंवा कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. या शांततामय वातावरणात तुम्ही तुमची प्रायव्हसी जपू शकता. या ठिकाणाहून टुरिस्ट प्लेसेसही कमी अंतरावर आहे. आशोर, मोरजिम मोरजिम या गावात वसलेला आशोर हा समुद्रकिनाऱ्याजवळचा एक आलिशान व्हिला आहे. दैनंदिन व्यापातून सुटका करायची असेल, तर हा उत्तम पर्याय आहे. इथल्या स्पा ट्रीटमेंट रूममध्ये तुम्ही स्वतःला पॅम्पर करू शकता. इथल्या लक्झरियस सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. व्हिलामध्ये एक मिनी थिएटर, इनडोअर गेम्स, एक टेरेस आणि स्टीम रूमदेखील आहे. आधुनिक फर्निचरसह इथली सजावट खरोखरच समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाला साजेशी आहे. शिवाय ती खूप आरामदायी आहे. इथल्या पूलमधून तुम्ही सनसेट पाहू शकता किंवा स्काय बारवर रात्र घालवू शकता. शांततापूर्ण वेळ घालवण्यासाठी हा व्हिला उत्तम पर्याय ठरू शकतो. वॉटरलीली, गोवा गोव्याच्या जुन्या रस्त्यांवर वसलेले वॉटरलीली व्हिला हे थांबण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या व्हिलाच्या भिंती पिवळ्या आणि निळ्या रंगानी सुंदर रंगवलेल्या आहेत. तर इथले विलक्षण लाकडी फर्निचर तुमच्या मनाला शांत करेल. जेंगा, माहजोंग आणि कॅरमसारख्या रोमांचक खेळ आणि अॅक्टिव्हिटीजचा तुम्ही आनंद घेऊ शकता. या शिवाय तिथे स्विमिंग पूल आहे, या खासगी पूलमध्ये तुम्ही पोहू शकता. वॉटरलीली व्हिला हे एक आकर्षक अभयारण्य आहे जे तुमच्या गोव्याच्या सुट्टीसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. इथं तुम्ही प्रायव्हसी जपत हॉटेलच्या लक्झरी सुविधांचा आनंद घेऊ शकता. इथे तुम्हाला अगदी घरासारखा कंफर्ट मिळेल. द हाइडआउट, कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रमधील एका शेतात वसलेला हा व्हिला गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे या खास जागेला ‘द हाइडआउट’ असं नाव देण्यात आलं आहे. ही एक ब्राईट आणि आनंदी जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांबरोबर काही दर्जेदार वेळ एकत्र घालवू शकता. पूलामध्ये तुम्ही दिवसभर वेळ घालवू शकता, तसंच लॉन खूप मोठा आहे, त्यामुळे काही मैदानी खेळ खेळणंही मजेदार ठरेल. इथल्या बारमध्ये स्नूकरच्या खेळाचा आनंद घ्या, नंतर संध्याकाळी चहा आणि भज्यांचा आस्वाद घेण्यासाठी टेरेसवर खाट टाकून बसू शकता. इथं भेट देणं तुमच्यासाठी मजेदार आणि रिलॅक्सिंग अनुभव असेल.