JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सर्वांत उंच गौतम बुद्धांचा पुतळा देशात उभा राहणार; पाहा काय आहे प्लॅन

सर्वांत उंच गौतम बुद्धांचा पुतळा देशात उभा राहणार; पाहा काय आहे प्लॅन

गौतम बुद्धांच्या या पुतळ्यावर (Lord Buddha statue) सध्या काम सुरू असून अवघ्या काही महिन्यांतच पुतळा उभारला जाणार आहे.

जाहिरात

Buddhas tallest statue

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बिहार, 29 जानेवारी : बिहारमधील बोधगयामध्ये (Bodhgaya) भगवान गौतम बुद्धांचा(Lord Buddha) सर्वांत भव्य पुतळा उभारला जाणार आहे. फायबर ग्लासचा पुतळा बोधगयेमधील मंदिरात बसवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे मूर्तिकार मिंटू पाल यांनी कोलकात्यातील बारानगरच्या घोषपाडा परिसरातील मैदानावर विविध तुकड्यांमध्ये हा पुतळा तयार करण्याचे काम सुरू केलं आहे. बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन(Buddha International Welfare Mission) च्या वतीने पुढील वर्षी (2022) बुद्ध पौर्णिमेआधी हा पुतळा बोधगयेमधील मंदिरात बसवला जाणार असल्याची माहिती मिंटू पाल यांनी दिली. संस्थेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार हा भारतातील सर्वात मोठा बुद्ध पुतळा असेल असा त्यांचा अंदाज आहे. या पुतळ्याचे काम सुरू असून यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी जाणार आहे. यानंतर हे सुटे भाग मंदिरापर्यंत वाहून नेण्यासाठी देखील काही कालावधी लागणार असल्याची माहिती पाल यांनी दिली. पुतळ्याला अंतिम स्वरूप हे मंदिरात दिलं जाणार असून त्यानंतर तो स्थापित केला जाणार आहे. कोलकात्याहून बोधगयापर्यंत या पुतळ्याचे सुटे भाग वाहून नेले जाणार आहेत. हे वाचा -  Microsoft चं नवीन ऑफिस तर पाहा; ताजमहालवरून प्रेरणा घेऊन केलीय रचना पाल यांनी यापूर्वी 80 फूट उंच दुर्गामातेची मूर्ती तयार केला आहे. कोलकात्यामधील देशप्रिय पार्क भागात त्यांनी 2015 मध्ये ती मूर्ती साकारली होता. जगातील देवीची सगळ्यात उंच मूर्ती असल्याचा दावा देखील करण्यात आला होता. गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानोदय म्हणजे साक्षात्कार झाला त्या बोधगया शहराला खूप महत्त्व आहे. भगवान गौतम बुद्धांचे शहर म्हणून ते जगभरात ओळखले जाते. बौद्ध धर्म दक्षिण आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हे वाचा -  दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत मोठी माहिती; घटनास्थळावरील CCTV फुटेजमुळे नेमका प्रकार उघड भारतासह शेजारील अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात आहे. चीन, जपान, कोरिया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भूटान, मालदीव या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायी बोधगया शहरात दरवर्षी भेट देण्यासाठी येत असतात. बौद्ध धर्म हा जगातील प्रभावी धर्म असून आज जगात बौद्ध धर्माचे 180 कोटींहून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत 25% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या