नवी दिल्ली, 29 जानेवारी : राजधानी दिल्लीतील VVIP भागात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बॉम्ब स्फोटाबाबत मोठा खुलासा झाला आहे. इस्त्रायल दूतावासापासून 150 मीटर अंतरावर झालेल्या हा ब्लास्टमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. येथून जाणाऱ्या एका कारमधून एक पॅकेट फेकण्यात आलं. ज्यानंतर थोड्याच वेळात स्फोट झाला. या स्फोटामुळे तीन गाड्यांचं नुकसान झालं आहे.
एका रिपोर्टनुसार सायंकाळी तब्बल 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाला. तपास यंत्रणा घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेच तपासत आहे. या फुटेजवरुन स्फोटाच्या काही वेळापूर्वी घटनास्थळाच्या जवळून एक कार गेली होती. या कारमधून एक पॅकेट फेकण्यात आलं होतं. रस्त्यावर झाडांजवळ जाऊन हे पॅकेट पडलं आणि काही वेळात स्फोट झाला.
एबीपीच्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, स्फोटासाठी वापरण्यात आलेलं सामान दिल्लीतील लोकल मार्केटमधून खरेदी करण्यात आलं होतं. कारवर बॉल बेअरिंगचे निशाण सापडले आहे. याच्या आधारावर बॉम्ब तयार करण्याचं साहित्य दिल्लीतून खरेदी करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार हा IED ब्लास्ट होता, मात्र स्फोटाची तीव्रता खूप कमी होती. म्हणजे यामध्ये ज्या विस्फोटकांचा वापर केला होता, त्याचं प्रमाण वा त्याची इंटेसिंटी जास्त नव्हती. गृहमंत्री अमित शहा यांना स्फोटाबाबत अपडेट करण्यात आलं आहे. गृहमंत्री आपल्या निवासस्थळी आहेत. दिल्ली पोलीस कमिश्नर आणि IB प्रमुख स्फोटाबाबत माहिती घेत आहेत.
हे ही वाचा-NIA ची टीम घेणार दिल्ली स्फोटामागील कारणाचा शोध; वाचा 10 महत्त्वाच्या गोष्टी
विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हा बॉम्ब स्फोट झाला. विजय चौकवर बिटिंग रिट्रिट या सोहळयासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित आहेत. IEDच्या स्वरुपातील ही स्फोटकं प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवलेली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाडयांच्या काचा फुटल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi Blast