JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Winter Health: थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा

Winter Health: थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा

हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होऊ लागतं, तेव्हा आपली मज्जासंस्था सक्रिय (सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम - sympathetic nervous system) होते आणि कॅटेकोलामाइन्सचा स्राव वाढवू शकते. यामुळं रक्तवाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते.

जाहिरात

heart attack

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जानेवारी : हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो (Heart Attack ) हे तुम्हाला माहीत आहे का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हिवाळ्यात शरीराचं तापमान कमी होऊ लागतं, तेव्हा आपली मज्जासंस्था सक्रिय (सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम - sympathetic nervous system) होते आणि कॅटेकोलामाइन्सचा स्राव वाढवू शकते. यामुळं रक्तवाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते, ज्यामुळं हृदयगती, रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी तसेच रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढते. कॅटेकोलामाइन स्राव म्हणजे काय? शरीरात कॅटेकोलामाइन खूप महत्त्वाचं आहे. हे मानवी शरीरातील विविध प्रकारच्या ऊतींवर काही द्रव टाकतं. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक ताणतणावाखाली असते, तेव्हा पेशींमध्ये काही कॅटेकोलामाइन्स स्रवतात. हा शारीरिक प्रतिसाद सहसा निरोगी असतो. परंतु, त्याची वाढ हृदयविकारास कारणीभूत ठरते, असं झी न्यूजच्या बातमीत म्हटलं आहे. हे वाचा -  Black Salt Water Benefits: विविध आजारांवर फायदेशीर आहे काळ्या मिठाचे पाणी; जाणून घ्या त्याविषयी सर्व माहिती रोजच्या सवयींमध्ये या बाबींची घ्या विशेष काळजी हृदयविकाराचा झटका येण्याचं मुख्य कारण म्हणजे ताण घेणं. जितका ताण घ्याल, तितका हृदयाविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, शक्य तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि एखादी बाब किंवा घटना मनाला लावून घेणं टाळा. याशिवाय दररोज व्यायाम करण्याची सवय ठेवली तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. यासाठी तुम्ही सायकलिंग, योगासनासारख्या इनडोअर व्यायामाचा पर्यायही निवडू शकता. हे वाचा -  Immunity Booster Fruits: शरीराची Immunity वाढवण्यासाठी औषधे नकोत, खा ही 7 फळं; आजार राहतील कोसो दूर अतिरिक्त प्रमाणात मीठ आणि साखरेचं सेवन टाळा. शक्य असल्यास, राईस ब्रान तेल किंवा मोहरीचं तेल आहारात वापरा. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणंदेखील खूप महत्वाचं आहे. जर, तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासोबतच हृदयालाही फायदा मिळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या