JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पोटावरची चरबी कमी करण्यासाठीचा घरगुती आणि सोपा उपाय; ही 5 हेल्दी ड्रिंक्स नियमित घेऊन पाहा

पोटावरची चरबी कमी करण्यासाठीचा घरगुती आणि सोपा उपाय; ही 5 हेल्दी ड्रिंक्स नियमित घेऊन पाहा

वजन कमी करण्याच्या आपल्या प्रवासात आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल अत्यंत जागरूक असणे आवश्यक आहे.

जाहिरात

Goodbye to belly fat

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली,31 जानेवारी: काटेकोरपणे व्यायामाचे नियम (Exercise) पाळण्याबरोबरच योग्य आहार (Healthy Food)घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. बर्‍याचदा आपण या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याकडं दुर्लक्ष करतो आणि एकाच बाबीवर लक्ष केंद्रित करतो. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींबद्दलही अत्यंत सजग असले पाहिजे. आपण आपल्या सिस्टीममध्ये तेच ठेवत असतो जे आपण खात असतो. आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखणे म्हणजेच हायड्रेटेड राहणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात एका छानशा उबदार पेयानं करू शकता आणि तुमची कंबर, पोट याभोवती असलेली चरबी(Belly Fats) कमी करण्याची शक्यता वाढवू शकता. अशाच काही छान पेयांनी चयापचय सुधारा आणि चरबी कमी करा. या पेयांच्या मदतीनं पोटावरील चरबी हटवण्यासाठी सज्ज व्हा : कोमट पाण्या****तून लिंबू आणि मध : वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू ( Lemon) पिळून ते पाणी पिणं हे सर्वात फायदेशीर मानले जाते. अँटीऑक्सिडंट्स, पेक्टिन फायबर, व्हिटॅमिन सी युक्त हे पेय एक अमृत मानले जाते जे आपल्या शरीरातून विष बाहेर टाकते, चयापचय वाढवते, पचनक्रिया सुधारते. त्यात मध (Honey) घातला तर त्याची उपयुक्तता वाढते. हे पेय पीत असाल तर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही योग्य मार्गावर आहात याची खात्री बाळगा. मेथीचे पेय : मेथी किंवा मेथीदाणे (Fenugreek) एक अत्यंत पौष्टिक बी आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते, रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित करते. यकृताचे आरोग्य सुधारते आणि चयापचयदेखील वाढवते. मेथी शरीरात उष्णता निर्माण करते आणि चरबी कमी करते. सकाळी उठल्यावर या मेथ्या भिजवलेलं पाणी सेवन करा आणि याचे विलक्षण फायदे मिळवा आणि वजन कमी करा. जिऱ्याचे पाणी : जिऱ्याचे (Cumin) पाणी पचन आणि चयापचय वाढवते. यात अतिशय कमी उष्मांक (Calories) असतात. यामुळं भुकेची तीव्रता नियंत्रित केली जाते. चरबी वेगानं कमी होते. रिकाम्या पोटी हे पाणी घेतल्यास अगदी अल्पावधीतच आश्चर्यकारक परिणाम दिसतात. हे देखील वाचा -  खवखवणाऱ्या घशाकडे दुर्लक्ष नको; असू शकतं मानसिक आजाराचं लक्षण ग्रीन टी आणि पुदिना : ग्रीन टी (Green Tea) तसेच पुदिना (Mint) यात अँटिऑक्सिडंटस (Antioxidants) असतात. या दोन्ही घटकांचे मिश्रण वजन कमी करण्यात मोठी  करते. यामुळे पाचकद्रव्यं एन्झाईम्स उत्तेजित होतात. पुदिन्यामुळं चरबी झपाट्यानं विद्राव्य ऊर्जेत रुपांतरित होते. ग्रीन टी चयापचय वाढवते आणि चरबी घटवण्यास मदत करते. या पेयात प्रतिजैविक आणि विषाणू प्रतिबंधक गुणधर्म असतात. आलं आणि लिंबू पेय : वजन कमी करण्यासाठी आलं (Ginger) आणि लिंबू (lemon) यांचं मिश्रणही उत्तम उपाय आहे. हे पेय दाह शांत करतं. तरतरी देतं. वेदनशामक, प्रतिजैविकं, अँटीऑक्सिडट अशा अनेक गुणधर्मांमुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे पेय अतिशय उत्तम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या