JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हे पदार्थ निष्काळजीपणे खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

हे पदार्थ निष्काळजीपणे खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; तुम्हीही ही चूक करत नाही ना?

कोणताही खाद्यपदार्थ खाणं ही मनाला समाधान देणारी बाब असते. परंतु, असेही काही खाद्यपदार्थ असतात की जे खाताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा हे पदार्थ खाणं जिवावर बेतू शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : उत्तम आरोग्यासाठी (Health) योग्य आहार (Diet) महत्त्वाचा असतो. आपल्या खाद्य संस्कृतीत (Food Culture) ही बाब विशेष अधोरेखित होते. कारण आपल्याकडचा जवळपास प्रत्येक पदार्थ आरोग्यासाठी पोषक ठरणारा असतो. सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे फास्ट फूड सेवनाकडे सर्वांचा कल अधिक आहे. फास्ट फूडच्या अति प्रमाणात सेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊन विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक देशाची खाद्यसंस्कृती भिन्न असते. काही देशांमध्ये दैनंदिन आहारात असे काही खाद्यपदार्थ समाविष्ट असतात, की ज्यांची नावंही आपण कधी ऐकलेली नसतात. परंतु, या चविष्ट पदार्थांमध्ये असे काही पदार्थ आहेत, की जे आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे असे पदार्थ सेवन करताना विशेष काळजी घेतली जाते. विविध देशांमधले असे हटके पदार्थ आणि त्यांविषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केली आहे. कोणताही खाद्यपदार्थ खाणं ही मनाला समाधान देणारी बाब असते. परंतु, असेही काही खाद्यपदार्थ असतात की जे खाताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा हे पदार्थ खाणं जिवावर बेतू शकतं. काजू खाणं बहुतांश जणांना आवडतं. काही जण आरोग्यासाठी पूरक म्हणून काजूचं सेवन करतात. परंतु, कच्चा काजू (Raw Cashew) खाणं धोकादायक ठरू शकतं. कच्च्या काजूत उरूशिओल हा घटक असतो. हा घटक आरोग्यासाठी अपायकारक असतो. तुम्ही कधी बर्ड नेस्ट सूपविषयी (Birds Nest Soup) ऐकलंय का? असं सूप बाजारात मिळतं. या सूपची रेसिपी खूप पुरातन आणि महागडी आहे. एक कप बर्ड नेस्ट सूपची किंमत सुमारे 10 हजार डॉलर असल्याचं बोललं जातं. हे वाचा -  कमी पगारामुळे लग्नासाठी मुलींनी दिला होता नकार; Paytm कंपनी स्थापन करुन झाला अब्जाधीश फुगु म्हणजेच पफरफिश (Pufferfish) ही डिशदेखील अत्यंत खबरदारी घेत खावी लागते. फुगु ही जपानी डिश आहे. पफरफिश हा जपानमधल्या (Japan) विषारी माशांपैकी एक मानला जातो. या माशाची डिश बनवण्याकरिता विशेष ट्रेनिंग दिलं जातं. या ट्रेनिंगदरम्यान ही डिश योग्य पद्धतीने न बनवणाऱ्या शेफला ही डिश बनवण्याचा परवाना दिला जात नाही. ही डिश बनवताना शेफकडून छोटीशी जरी चूक झाली, तरी ती खाणाऱ्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. ब्लड क्लाम (Blood clams) अर्थात शिंपले चीनमध्ये सेवन केले जातात. ब्लड क्लाम डिश ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी ठेवली जाते. ही डिश खाताना काही चूक झाली तर टायफॉइड किंवा हेपॅटायटिससारखे आजार होऊ शकतात. हे वाचा -  Pension Account : पेन्शन खातं बँकेच्या जवळच्या शाखेत ट्रान्स्फर कसं करायचं? वाचा स्टेप्स लाल कच्च्या राजमामध्ये (Raw Kidney Beans) अनेक प्रकारचे विषारी घटक असतात. कच्च्या राजम्याच्या चार ते पाच बिया खाणंदेखील जीवावर बेतू शकतं. तसंच अर्धवट शिजलेला राजमादेखील शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो. फ्राइड ब्रेन सॅंडविच (Fried Brain Sandwich) हे गाय किंवा वासराच्या मेंदूपासून तयार करतात. यामध्ये मेंदू तळून सर्व्ह केला जातो. ही डिश अमेरिकेत प्रसिद्ध आहे. परंतु, या डिशच्या सेवनामुळे वारंवार होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन आता या डिशवर बंदी घालण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या