JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Solar Fan : वीज नसली तरीही तासभर चालणार फॅन, किचनमध्ये लावला तर बायको होईल खूश

Solar Fan : वीज नसली तरीही तासभर चालणार फॅन, किचनमध्ये लावला तर बायको होईल खूश

उन्हाळ्यात तुम्हालाही असा पंखा घरी आणायचा असेल, जो कमी किमतीत मिळेल आणि जास्त वीज देखील वापरणार नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला एका अशा फॅनबद्दल सांगणार आहोत जो फॅन विजेशिवाय चालून तुम्हाला कडक उन्हात थंड हवा देईल.

जाहिरात

वीज नसली तरीही तासभर चालणार फॅन, किचनमध्ये लावला तर बायको होईल खूश

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्या उन्हाचा तडाखा वाढत असलयाने प्रत्येकजण या ऋतूत थंड राहण्याचा मार्ग शोधत आहे. उकाड्यात काहीसा थंडावा मिळावा म्हणून अनेकजण एसी, कुलर खरेदी करीत असतात. परंतु या उपकरणांच्या वापरामुळे थंडावातर मिळतो पण नंतर आलेल विजेचं आवाढव्य बिल पाहून सर्वसामान्यांना पुन्हा घाम फुटतो. परंतु बाजारात असे अनेक पंखे उपलब्ध आहेत जे आपल्याला थंड हवा तर देतातच आणि सोबत वीज देखील वाचवतात. आपण इथे बोलत आहोत सोलार म्हणजेच सौरउर्जेवर चालणाऱ्या फॅनबद्दल बोलत आहोत. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंख्याना विजेची गरज नसते, आणि ते केवळ सूर्याकडून मिळणाऱ्या उर्जेवर काम करतात. सौरऊर्जेवर चालणारे हे पंखे दिवसा सूर्यप्रकाशावर चार्ज होऊन तुम्हाला आराम देतातच, पण रात्री देखील काही तास सुरळीत चालतात. कारण त्यामध्ये बॅटरी चार्जिंग सिस्टिम उपलब्ध आहे. म्हणजेच रात्री सूर्य नसताना किंवा दिवसा पुरेसा सूर्यप्रकाश नसेल तरी हे पंखे तासंतास तुम्हाला थंड हवा देत राहतात. तेव्हा आपण फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अँपवर उपलब्ध असलेल्या काही सोलार पंख्यांविषयी जाणून घेऊयात. Samest 12 Volts DC Fan Solar Panel :  फ्लिपकार्टवर या सोलर फॅनची किंमत रु.329 आहे. हा सोलर फॅन १२ व्होल्टच्या बॅटरीवर काम करतो. याशिवाय, तुम्ही याला थेट सोलर पॅनलशी जोडूनही चालवू शकता, तुम्ही हा फॅन तुमच्या घरात तसेच कार टॅक्सी किंवा ऑफिसमध्येही लावू शकता. Electronics Crafts Table Solar Fan:  फ्लिपकार्टवर या फॅनची किंमत ३३९ रुपये इतकी आहे. हा पंखा 12 व्होल्ट डीसीसह येतो आणि कार, ऑफिस किंवा घरात आरामात बसवता येतो. या फॅनचे वजन खूप हलके असल्याने तो सहज कोठेही लावला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या