JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care Tips : त्वचा विकारांवर कडुलिंबाची पानं ठरतात गुणकारी, त्वचेच्या समस्या होतील दूर

Skin Care Tips : त्वचा विकारांवर कडुलिंबाची पानं ठरतात गुणकारी, त्वचेच्या समस्या होतील दूर

कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्यानं स्नान केल्यास त्वचेचा कोरडेपणा (Dry Skin) कमी होतो. यामुळे साबण आणि बॉडीवॉशची गरज कमी लागते.

जाहिरात

कडुलिंबाची पानं - एक लिटर पाण्यात कडुनिंबाची पाने उकळून हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून रोज आंघोळ केल्यास घामोळे निघून जातील.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 डिसेंबर : निसर्गातील अनेक वनस्पती या मानवी आरोग्यासाठी (Health) वरदान आहेत. आयुर्वेदात (Ayurveda) देखील मानवी आरोग्यासाठी हितावह असलेल्या अनेक वनस्पतींविषयी माहिती उपलब्ध आहे. अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे आरोग्यविषयक समस्या वाढलेल्या आहेत. त्यात त्वचा विकारांचं (Skin Disease) प्रमाण लक्षणीय आहे. त्वचा सुंदर दिसावी म्हणून अनेक उपाय केले जातात. विविध प्रकारचे कॉस्मेटिक्स (Cosmetics) वापरले जातात. परंतु, कडुलिंब (Neem) ही अशी वनस्पती आहे की सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर उपयुक्त ठरते. नियमित कडुलिंबाचा वापर केल्यास त्वचा नितळ, सुंदर होते. कोमट पाण्यात कडुलिंबाची पानं टाकून स्नान केल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. कडुलिंबाच्या अजूनही अनेक फायदे आहेत. याबाबतची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे. कडुलिंबाच्या पानांमध्ये फॅटी ॲसिड्स, लिमोनॉइड्स, व्हिटॅमिन– ई, अँटी ऑक्सिडंट गुणधर्म, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर कडुलिंब गुणकारी ठरतं. हिवाळ्याच्या दिवसात कडुलिंबाच्या तेलाचा (Neem Oil) वापर फायदेशीर ठरतो. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब टाकावेत. तसेच स्नानापूर्वी संपूर्ण शरीराला मोहरीचं तेल आणि कडुलिंबाचं तेल एकत्र करून मालिश करावं. याशिवाय फेस पॅकमध्ये कडुलिंबाच्या तेलाचे थेंब टाकल्यास त्वचेला निश्चित फायदा होतो. यामुळे मुरूम आणि काळ्या डागांची समस्या दूर होते. कडुलिंबाचं तेल नाईट सीरममध्ये मिसळून वापरता येतं. कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्यानं स्नान केल्यास त्वचेचा कोरडेपणा (Dry Skin) कमी होतो. यामुळे साबण आणि बॉडीवॉशची गरज कमी लागते. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलकटपणा संतुलित राहतो. कडुनिंबाच्या पाण्यामुळे डोक्यातील कोंड्याची (Dandruff) समस्या दूर होते. तसेच त्वचेवरील संसर्गाची समस्या देखील कमी होते. त्वचेचा कोरडेपणा दूर कऱण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापरही फायदेशीर ठरतो. या तेलाच्या नियमित वापरामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. कडुलिंबाच्या पानांचा लेप त्वचेवर लावल्यास अधिक फायदेशीर ठरतो. त्वचेवर प्रमाणापेक्षा अधिक सुरकुत्या असतील तर कडुलिंबाच्या पानाचा लेप लावावा. यामुळे सुरकुत्यांसह त्वचेवरील डागही कमी होण्यास मदत होते. एकूणच कडुलिंब हे दातांच्या आरोग्याप्रमाणे त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या पानांचा नियमित वापर केल्यास विविध त्वचा विकार आणि त्वचेवरील संसर्ग बरे होतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या, डाग नाहीसे होतात. त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. मुरुमांच्या समस्येवर कडुनिंबाची पानं हे रामबाण औषध आहे. कडुलिंबाच्या पानांच्या वापरानं त्वचेशी निगडीत सर्व समस्यांपासून सुटका होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या