JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Kitchen Cleaning Tips : किचन टाइल्स तेलकट मळकट झालीये? 4 सोप्या टिप्स वापरून करा चकचकीत

Kitchen Cleaning Tips : किचन टाइल्स तेलकट मळकट झालीये? 4 सोप्या टिप्स वापरून करा चकचकीत

किचन टाईल्स वरील हट्टी डागांना साफ करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे हे डाग काही क्षणातच दूर होतील.

जाहिरात

किचन टाइल्स तेलकट मळकट झालीये? 4 सोप्या टिप्स वापरून करा चकचकीत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनेकदा किचनमध्ये जेवण बनवताना टाईल्स आणि भिंतीवर तेलकट डाग पडतात. वेळच्यावेळी हे डाग साफ केले नाहीत तर हे डाग हट्टी होतात आणि मग साफ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परंतु आता किचन टाईल्स वरील हट्टी डागांना साफ करण्याचं टेन्शन विसरून जा. कारण यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे हे डाग काही क्षणातच दूर होतील. डाग स्वच्छ करण्यासाठी 4 उपाय लक्षात घ्या : बेकिंग सोडा : किचनच्या टाईल्स किंवा भिंतीवरील तेलाचे चिकट डाग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम उपाय आहे. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. मग डाग असलेल्या भागावर ही पेस्ट लावून 15 ते 20 मिनिटे तशीच राहू द्या. नंतर एका स्वच्छ कपड्याने आणि पाणी घेऊन भिंतीवरील ही पेस्ट पुसून टाका. भिंत कोरडी झाल्यावर त्यावरील डाग दिसणार नाहीत. लिक्विड डिशवॉश :  टाईल्स आणि भिंतीवरील डाग काढण्यासाठी सर्वात स्वस्त उपाय म्हणजे लिक्विड डिशवॉश.  लिक्विड डिशवॉश डागांवर लावा आणि तासभर भिंतीवर तसेच राहू द्या. मग एक स्वच्छ कापड घेऊन त्याचे एक टोक पाण्याने भिजवून भिंतीवरचे लिक्विड डिशवॉश पुसून घ्या.

व्हिनेगर : व्हिनेगर हे हट्टी डाग काढण्यासाठी प्रभावी ठरते. यासाठी भिंतीवरील तेलाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन, त्यानंतर स्पंज किंवा कापडाने तेलाच्या डागावर लावा. 10 ते 15 मिनिटे असेच ठेवून मग ओल्या कापडाने पूर्णपणे पुसून टाका. Gas Cylinder : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक, कसं ओळखायचं? एका टॉवेलमुळे समजेल सिलेंडर रिकामा की भरलेला! हेअर ड्रायर : हेअर ड्रायर हे किचन टाईल्स किंवा भिंतीवरील हट्टी डाग काढण्यासाठी उपयोगी आहेत. तेलकट डागांवर एक पेपर लावून त्यावर इस्री किंवा हेअर ड्रायर फिरवा. यामुळे चिकट झालेले तेल वितळते मग वरील कोणतीही पद्धत वापरून ते स्वच्छ करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या