नवी दिल्ली, 09 जानेवारी : शीतपेये म्हणजेच कोल्ड्रिंक्स (cold-drinks) शौकीन लोकांनी आता सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण ज्या कोल्ड्रिंक्सच्या दोन-दोन बाटल्या जे मोठ्या प्रेमाने गटकतात, ही पेय तुम्हाला कर्करोगाचे रुग्णही बनवू शकतात. जर्नल Gutमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जे प्रौढ व्यक्ती दररोज दोन किंवा अधिक साखरयुक्त पेये पितात त्यांना आतड्याच्या कर्करोगाचा (Intestinal cancer) धोका दुप्पट असतो. टीव्ही 9 ने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारचे शर्करायुक्त पेय जसे की फ्रुट फ्लेवर्ड ड्रिंक्स, स्पोर्ट्स आणि एनर्जी ड्रिंक्स इत्यादी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. महिलांनी यापेक्षा अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण 50 वर्षे वयापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांना अशा कर्करोगाचा धोका असतो. आतड्यांचा कॅन्सर हा जीवघेणा आहे. पण वेळीच त्याचे निदान झाले आणि तुमची जीवनशैली नियंत्रित ठेवली तर परिस्थिती हाताळता येते. हे संशोधन करण्यासाठी, सुमारे 24 वर्षे 95,464 सहभागींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये आतड्यांच्या कॅन्सरबाबत कौटुंबिक इतिहास, जीवनशैली आणि आहार या सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली. संशोधनादरम्यान, असे आढळून आले की, ज्या 109 महिलांनी जास्त साखरयुक्त पेये घेतली होती, त्यांना 50 वर्षापूर्वी अशा कॅन्सरची समस्या होती. त्याच वेळी, ज्या महिला एका दिवसात एकापेक्षा जास्त साखरयुक्त पेय पितात, त्यांना कर्करोगाचा धोका दुप्पट असल्याचे दिसून आले. ज्या स्त्रिया आठवड्यातून एक साखरयुक्त पेय पितात त्यांना कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होता. या साखरयुक्त पेयांचे सेवन कमी केल्यास आतड्याच्या कॅन्सरचा धोका बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतो, असे संशोधकांचे मत आहे. हे वाचा - पूर्ण-नीट झोप न घेणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा; नवीन संशोधनाचे भीतीदायक निष्कर्ष या बाबतीत तज्ज्ञांचे मत पाहिले, तर साखरयुक्त पेये आरोग्यासाठी इतर मार्गांनीही हानिकारक आहेत. या पेयांमध्ये कृत्रिम साखर, प्रिझर्वेटिव्ह इत्यादींचा वापर केला जातो. याच्या अतिसेवनाने लठ्ठपणाची समस्या वाढते. वाढत्या लठ्ठपणामुळे, अकाली हृदय, बीपी, मधुमेह, थायरॉईड आणि हार्मोनल समस्या कमी वयातच व्यक्तीला घेरतात. याशिवाय हे पेय तुमच्या यकृतालाही हानी पोहोचवतात. त्यात असलेले फ्रक्टोज पचवण्यासाठी यकृताला खूप मेहनत करावी लागते, त्यामुळे यकृताला अनेकदा सूज येते. त्यामुळे तरुण, लहान मुलांसह कोणत्याही वयोगटातील लोकांनी त्याचे सेवन टाळावे. हे वाचा - E-Shram Card: काय आहेत ई-श्रम कार्डचे फायदे? कशी करावी नोंदणी? (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)