JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पांढरे केस होणार पुन्हा काळे, शास्त्रज्ञांचा नवा शोध

पांढरे केस होणार पुन्हा काळे, शास्त्रज्ञांचा नवा शोध

शारीरिक हालचाली मंदावणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं याचबरोबर केस पांढरे होणं हे माणसाचं वय वाढून तो म्हातारा होत असल्याचं लक्षण मानलं जातं. पण आता पांढरे झालेले केस रंग न लावता पुन्हा काळे करता येणार आहेत.

जाहिरात

पांढरे केस होणार पुन्हा काळे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 एप्रिल :  शारीरिक हालचाली मंदावणं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणं याचबरोबर केस पांढरे होणं हे माणसाचं वय वाढून तो म्हातारा होत असल्याचं लक्षण मानलं जातं. पण आता पांढरे झालेले केस रंग न लावता पुन्हा काळे करता येणार आहेत. उंदरांवर हा प्रयोग यशस्वी झाला असून लवकर माणसालाही या संशोधनाचा वापर करता येईल. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ ने दिलं आहे. न्यूयॉर्क विद्यापिठातील ग्रॉसमन स्कूल ऑफ मेडिसीनमधील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केल्या संशोधनातून काळ्या केसांतील पिगमेंट कमी झाल्यामुळे ते पांढरे होतात असा शोध लावला आहे. पण पांढरे केस रंगाशिवाय पुन्हा काळे होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे.संशोधकांच्या मते त्यांनी अनेक प्रकारच्या पेशी विकसित करणाऱ्या स्टेम सेल्सचा शोध लावला आहे. या पेशी केसांच्या मूळांशी असलेल्या विविध भागांत हालचाल करू शकतात असं या पेशींचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जाणून घेऊया केसांचा रंग कशाप्रकारे पुन्हा आणता येऊ शकतो ते. 2 आठवड्यात चेहऱ्यावरच्या सुरकुत्या नाहीशा करायच्यात? मग या फळाचा रस रोज चेहऱ्याला लावा डेलीमेलममधील रिपोर्टनुसार,वय वाढल्यावर माणसाच्या केसांतील स्टेम सेल्स हेअर फॉलिकलमध्ये अडकतात. तरुणवयात या पेशी यातून बाहेर पडू शकतात पण ते आता शक्य नसतं. त्यामुळे त्या पिगमेंट तयार करू शकत नाहीत. पिगमेंटच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात. मग केसांना रंग लावावा लागतो. शास्त्रज्ञांनी माणसाच्या केसांच्या रंगावर नियंत्रण ठेवणाऱ्या मिलेनोसाइट स्टेम सेल्स शोधल्या आहेत. नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार शास्त्रज्ञांनी म्हटलंय की त्यांना असं आढळून आलंय की मिलेनोसाईट पेशी केसांना रंग देण्यासंबंधी कार्य करतात. शास्त्रज्ञ आता केसांच्या मुळाशी अडकणाऱ्या स्टेम सेल्स मुक्त करतील जेणेकरून त्या पिगमेंट तयार करू शकतील आणि केसांचा रंग पुन्हा काळा होऊ शकेल. शास्त्रज्ञ आता स्टेम सेल्सचा वापर करून माणसांच्या केसांचा रंग नैसर्गिक पद्धतीने काळाल करण्याची पद्धत शोधत आहेत. उंदरांवर केलेला प्रयोग यशस्वी झाला असून त्याच्या केसांतील पिगमेंट परत आल्यामुळे त्याचे पांढरे केस काळे झाले आहेत अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. त्यामुळे माणसालाही पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या