JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Relationship Tips : मुलं झाल्यानंतर नात्यात येऊ लागलाय दुरावा, मग या 4 टिप्स फॉलो करा, जोडीदाराशी पुन्हा वाढू लागेल जवळीक

Relationship Tips : मुलं झाल्यानंतर नात्यात येऊ लागलाय दुरावा, मग या 4 टिप्स फॉलो करा, जोडीदाराशी पुन्हा वाढू लागेल जवळीक

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर, जोडप्यांना लहान बाळांना हाताळण्याचा फारसा अनुभव नसल्याने त्यांचे संपूर्ण लक्ष मुलावर असते, त्यामुळे पती पत्नी एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत. तेव्हा बाळाच्या जन्मानंतर जोडीदारांमध्ये निर्माण झालेले अंतर कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

जाहिरात

मुलं झाल्यानंतर नात्यात येऊ लागलाय दुरावा, मग या 4 टिप्स फॉलो करा, जोडीदाराशी पुन्हा वाढू लागेल जवळीक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साधारणपणे लग्नानंतरचे झालेले पहिले मुलं हे पती-पत्नीमधील नाते अधिक घट्ट होण्यास मदत करते, परंतु काहीवेळा मुलं झाल्यानंतर जोडीदारांमध्ये दुरावाही येतो. अशा परिस्थितीत, पती पत्नीच्या नात्यातील संबंध मजबूत करण्यासाठी आणि नातेसंबंधात जवळीक आणण्यासाठी तुम्ही या रिलेशनशिप टिप्स फॉलो करू शकता. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर, जोडप्यांना लहान बाळांना हाताळण्याचा फारसा अनुभव नसल्याने त्यांचे संपूर्ण लक्ष मुलावर असते, त्यामुळे पती पत्नी एकमेकांसाठी  वेळ काढू शकत नाहीत. तेव्हा बाळाच्या जन्मानंतर जोडीदारांमध्ये निर्माण झालेले अंतर कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा. एकत्र वेळ घालवा : बाळाच्या आगमनानंतर, पती पत्नीला एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि एकमेकांशी बोलण्यासाठी क्वचितच वेळ मिळतो, ज्यामुळे त्यांच्या नात्यात अंतर येऊ लागते. अशा परिस्थितीत बाळाला काही काळासाठी कुटुंबातील इतर सदस्यांकडे सोपवून तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे. जर घरात दुसरे कोणी नसेल, तर मूल झोपल्यानंतरही तुम्ही जोडीदारासाठी वेळ काढू शकता, जेणेकरून त्यांना त्याचे महत्त्व जाणवेल. समृद्ध जीवनासाठी करा स्नानाचे हे उपाय, स्नानाचे 4 प्रकार आणि सर्वोत्तम वेळ पुरेशी झोप घ्या : एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्हा दोघांनाही पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. अनेकदा लहान मुलं रात्री झोपत नाहीत अशावेळी जोडप्यांची सुद्धा झोप मोड होते. झोप न मिळाल्याने दिवसभर चिडचिड होते. अशा परिस्थितीत, काही काळ आळीपाळीने मुलाची काळजी घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एखाद्याला झोपेचा त्रास होणार नाही आणि दोघेही झोपू काहीकाळ विश्रांती घेऊ शकतात.

बेबी मूनवर जा : जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बेबीमूनवर जाऊ शकता. अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदार आणि बाळाला घेऊन  चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. यामुळे तुम्हा दोघांना घरातील कामांपासून विश्रांती मिळेल आणि तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. तुमची ही काळजी घ्या : बाळ झाल्यानंतर अनेकदा पती पत्नी स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. तेव्हा त्यामुळे अनेकदा तुमची चिडचिड होऊ लागते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकत नाही. अशा परिस्थितीत स्वत:साठीही वेळ काढण्याचा प्रयत्न करा. यावेळेत तुम्ही तुमचा छंद जोपासू शकता. एवढेच नाही तर तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, यामुळे जोडीदार आणि बाळालाही आनंद वाटेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या