JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chicken Recipe : घरच्या घरी बनवा टेस्टी KFC स्टाईल चिकन, जाणून घ्या खास रेसिपी

Chicken Recipe : घरच्या घरी बनवा टेस्टी KFC स्टाईल चिकन, जाणून घ्या खास रेसिपी

केएफसीमध्ये मिळणारे चिकन पॉपकॉर्न, चिकन ड्रमस्टिक्स हे पदार्थ नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचे आहेत. तेव्हा तुम्हाला असे टेस्टी चिकन पदार्थ घरच्या घरी बनवता यावेत यासाठी केएफसी स्टाईल चिकनची खास रेसिपी घेऊन आलो आहोत.

जाहिरात

घरच्या घरी बनवा टेस्टी KFC स्टाईल चिकन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साहित्य : चिकन मॅरिनेशनसाठी : अर्धा किलो चिकन ड्रमस्टिक्स एक लिंबू मोठा चमचा आलं लसूण पेस्ट/ लसूण पावडर मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे, धणे पावडर मीठ चवीनुसार

आवरणासाठी: एक वाटी मैदा एक चमचा लसूण पावडर एक चमचा चिली फ्लॅक्स एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर मीठ चवीनुसार तेल तळण्यासाठी कृती : सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला वरील दिलेले साहित्य वापरून मॅरीनेट करा. चिकन मॅरीनेट केल्यावर ते जास्तीत जास्त 5 तास तर कमीतकमी 1 तास तसेच ठेवा. वरचे आवरण तयार करण्यासाठी एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण पावडर, चिली फ्लॅक्स, मीठ एकत्र करून पाण्याने भज्याच्या पिठासारखे भिजवून घ्या. मॅरीनेट केलेले चिकन भिजवलेल्या पिठाच्या मिश्रणात बुडवून ठेवा. त्यानंतर कढईत गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या. अशाप्रकारे गरमागरम KFC स्टाईल चिकन ड्रमस्टिक्स  तयार होतात. हेच कृती तुम्ही चिकन पॉपकॉन बनवण्यासाठी देखील वापरू शकता. गरमागरम केएफसी चिकन तुम्ही मेयॉनीज अथवा कोणत्याही सॉस सोबत खाऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या