JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Jilebi Recipe : दसऱ्याला फक्त 15 मिनिटांत घरीच बनवा रसरशीत, कुरकुरीत जिलेबी; ही आहे सोपी रेसिपी

Jilebi Recipe : दसऱ्याला फक्त 15 मिनिटांत घरीच बनवा रसरशीत, कुरकुरीत जिलेबी; ही आहे सोपी रेसिपी

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर छान कुरकुरीत आणि घरी बनलेली गरम गरम जिलेबी जर आपल्याला मिळाली तर अजून काय हवं? ही जिलेबी बनवायला खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेत बनते. घरी नक्की बनवून बघा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 ऑक्टोबर : दसरा जवळ येतोय. आता सर्वांची कपड्यांची, सजावटीची इतर सर्व तयारी झाली असेल. दसऱ्याच्या दिवशीदेखील आपल्याला तयार व्हायचं असतं घर सजवायचं असतं, पाहुण्यांकडे जायचं असतं, घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करायचं असत. अशात आपल्याला स्वयंपाक घरात जास्त वेळ मिळत नाही. तेव्हा मिठाई बनवण्यासाठीही जास्त वेळ नसतो. मात्र जर अगदी कमी वेळेत तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवता आला तर? गोड पदार्थात काही खास तुम्हाला बनवायचे असेल तर जिलेबी हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. दसऱ्याला कमी वेळेत छान कुरकुरीत आणि घरी बनलेली गरम गरम जिलेबी जर आपल्याला मिळाली तर अजून काय हवं? तुम्ही करंज्या, मालपुआ वगैरे गोड पदार्थ अनेकवेळा घरी बनवून खाल्ले असेलच, पण यंदाच्या दसऱ्याला ही जिलेबी घरी नक्की बनवून बघा. ही बनवायला खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेत बनते.

नवरात्रीत झटपट तयार होणारे ‘हे’ खास पदार्थ; प्रवासातही नेता येतील सहज अन् आरोग्यालाही पोषक

जिलेबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य साखर पाणी मैदा वेलची पूड इनो खाण्याचा रंग किंवा केसर तूप

जिलेबीचा पाक बनवण्याची कृती जिलेबीचा पाक बनवण्यासाठी एक खोल भांडं घ्या. त्यात दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी टाका. यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेलची पुडदेखील घालू शकतात. त्याचबरोबर जिलेबीला छान रंग येण्यासाठी यामध्ये केशरी खाण्याचग रंग किंवा केसर घाला. तुम्ही जेवढा रंग तुम्ही या पाकमध्ये किंवा चाचणीमध्ये घालाल. तसाच रंग तुमच्या जिलेबीला येणार आहे. त्यामुळे तुमच्या आवडीनुसार, गडद किंवा हलका रंग चाचणीत घाला. आता मिडीयम फ्लेमवर ही चाचणी बनण्यासाठी ठेवा.

जिलेबी बनवण्याची कृती सर्वात आधी आपल्याला जिलेबीचे बॅटर तयार करावे लागेल. यासाठी एका भांड्यात किंवा ताटात एक वाटी मैदा घ्या. ज्या वतीने आपण साखर मोजली होती त्याच वतीने मैदाही मोजून घ्या. नंतर यामध्ये एक मोठा चमचा तूप घाला. तसेच इन्स्टंट फर्मेंटेशनसाठी यामध्ये एक पॅकेट इनो घाला. आता हे सर्व हाताने कोरडेच व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचे आहे.

मात्र थोडे थोडे करून हे पाणी घाला आणि त्याचे बॅटर बनवण्यास सुरुवात करा. प्रयत्न करा की हे बॅटर अगदी सॉफ्ट होईल आणि यामध्ये कमीत कमी गुठळ्या राहतील. त्यानंतर ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असे हे बॅटर तयार करून घ्या. आता एक कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. नंतर तयार केलेले बॅटर केकच्या पायपिंग बॅगच्या साहाय्याने किंवा सॉस बॉटलच्या साहाय्याने कढईत टाका.

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये देवीला दाखवा चंपाकळीचा खास नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी VIDEO

संबंधित बातम्या

कढईमधील तेल गरम झाल्यानंतर जिलेबीचा गोल गोल आकारात हे बॅटर तेलामध्ये टाका. आणि हलका गोल्डन कलर येईपर्यंत तळा. जिलेबी टाळून झाल्यानंतर लगेच साखरेच्या चाचणीमध्ये टाका. ही जिलेबी तळल्यानंतर लगेच चाचणीमध्ये टाकणे आवश्यक असते. यानंतर काही सेकंदात तुमची जिलेबी पाक पिऊन तयार होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या