मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नवरात्रीत झटपट तयार होणारे 'हे' खास पदार्थ; प्रवासातही नेता येतील सहज अन् आरोग्यालाही पोषक

नवरात्रीत झटपट तयार होणारे 'हे' खास पदार्थ; प्रवासातही नेता येतील सहज अन् आरोग्यालाही पोषक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नऊ दिवस उपवास करताना आपल्या प्रकृतीची योग्य काळजी देखील घ्यावी लागते. नाहीतर आपण कमजोर आणि आजारी पडू शकतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : नवरात्रोत्सव नुकताच सुरू झालाय. देशात सर्वत्र जल्लोषाच्या वातावरणात हा सण साजरा केला जातोय. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जण उपवास करत असतात. वास्तविक निरोगी आरोग्यासाठी ठराविक दिवसांमध्ये उपवास करायला हवा, असं मानलं जातं. पण नऊ दिवस उपवास करताना आपल्या प्रकृतीची योग्य काळजी देखील घ्यावी लागते. या काळात विशेषत्वाने खाण्या-पिण्याकडे लक्ष दिलं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण कमजोर आणि आजारी पडू शकतो.

नवरात्रीत जर तुम्ही उपवास करत असाल आणि प्रवास देखील करत असाल, तर खुप मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरी तयार केलेले काही खास पदार्थ तुम्ही सोबत नेले तर निश्चितच प्रकृतीसाठी ते उत्तम ठरू शकतं.

हिंदू धर्मीयांत नवरात्रीचा सण पवित्र मानला जातो. यंदा 26 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातोय. या काळात भाविक हे दुर्गा मातेची आराधना करतात. नवरात्रीत नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. ती अनेकांकडून पाळलीही जाते. प्रवासाला जाणाऱ्या व्यक्तीनं काही झटपट होणारे आणि शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणारे पदार्थ सोबत नेल्यास अडचण उद्भवणार नाही.

साबुदाणा वडे

नवरात्रीत तुम्हाला प्रवास करायचा असल्यास साबुदाणा वडा हा उत्तम पर्याय मानला जातो. दूरवरचा प्रवास करायचा असला तरी साबुदाणा वडे दीर्घकाळ चांगले राहू शकतात. शिवाय याचं सेवन करणं अत्यंत सोप आहे.

साबुदाणा वड्यांसह तुम्ही बटाटे किंवा पनीरचे चिप्सही बरोबर घेऊन जाऊ शकता. टोमॅटो किंवा दह्यासोबत तुम्ही याचं सेवन करू शकता.

साबुदाण्याचे इतर पदार्थ

उपवासाच्या पदार्थांत साबुदाणा हा सर्वात लोकप्रिय असा पदार्थ आहे. नवरात्रीत स्नॅक्समध्ये अनेकजण साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थांचं सेवन करण्यास प्राधान्य देतात. साबुदाणा वड्याप्रमाणे साबुदाण्याची खिचडी खूप प्रसिद्ध आहे. शिवाय हा आहार हलका असतो. उपवसादरम्यान शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.

बटाटे

उपवसाचे पदार्थ तयार करताना बहुतांश वेळा बटाट्याचा वापर केला जातो. शुद्ध देशी तुपात बटाटे तळून घेतले तर हा चांगला पदार्थ तयार होतो. प्रवासाला जातानाच बटाटे तळून सोबत घ्यावे म्हणजे प्रवासात भूक लागली की त्या बटाट्यांचं सेवन करता येईल. सोयीचं पडावं म्हणून बटाट्यांचे काप करायलाही हरकत नाही.

कुट्टूचे पराठे

नवरात्रीत कुट्टुच्या (Buckwheat) पिठापासून तयार केलेले पराठे खायला हवेत. आठ तासांपर्यंत हे पराठे चांगले राहू शकतात. त्यानंतरही यांचं सेवन केलं जाऊ शकतं. दह्यासोबत हे पराठे खाता येतात.

नोकरी किंवा कुठल्याही कामानिमित्त अनेक लोकांना सतत प्रवास करावा लागतो. अशातच नवरात्रीत उपवासादरम्यान प्रवास करावा लागला आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्यास त्यांचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेले पदार्थ सोबत बाळगल्यास याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

First published:

Tags: Food, Health Tips, Navratri