JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Raksha Bandhan : यंदा रक्षाबंधन नेमके कोणत्या तारखेला? या मुहूर्तावर भावाला बांधा राखी

Raksha Bandhan : यंदा रक्षाबंधन नेमके कोणत्या तारखेला? या मुहूर्तावर भावाला बांधा राखी

भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असलेला रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण कोणत्या तारखेला साजरा केला जाणार हे जाणून घेऊयात.

जाहिरात

यंदा रक्षाबंधन नेमके कोणत्या तारखेला? या मुहूर्तावर भावाला बांधा राखी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाराणसी, 1 जून : भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असलेला रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी श्रावण पौर्णिमा 30  ऑगस्ट रोजी असली तरी यंदा रक्षाबंधनाच्या या सणावर भाद्रची सावली असणार आहे. त्यामुळे रक्षाबंधच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काशीचे विद्वान आणि ज्योतिषाचार्य पंडित संजय उपाध्याय यांनी सांगितले की, पौर्णिमा ३० ऑगस्ट रोजी सकाळी 10.55 पासून सुरु होणार आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:05 पर्यंत राहील. पंचांगानुसार पौर्णिमा तिथीच्या प्रारंभाबरोबरच भाद्रा देखील पाळला जात आहे. जो 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:01 वाजता संपेल. भावाला यामुहूर्तावर बांधा राखी : विद्वानांच्या मते, अशा स्थितीत 30ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजून 1 मिनिटांनंतर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. ज्या बहिणींना 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.15 नंतर भावाच्या मनगटावर राखी बांधता येणार नाही, त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 च्या आधी राखी बांधू शकतात.

यावर्षी देखील दोन दिवस साजरे केले जाणार रक्षाबंधन : यंदाही 30 आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. गतवर्षी 2022 मध्ये देखील भाद्र निमित्त रक्षाबंधनाचा सण दोन दिवस साजरा करण्यात आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या