पुणे, 27 जुलै : भारतीय संस्कृती आणि परंपरेत पैंजणाला मोठं महत्त्व आहे. अनेक भारतीय महिला लग्नानंतर किंवा एखाद्या कार्यक्रमात पैंजण आवडीनं घालतात. स्त्रियांच्या 16 श्रृंगारातला हा महत्त्वाचा भाग आहे. अधिक महिन्यात भारतीय संस्कृतीमधल्या या दागिन्याकडं संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्याच्या उद्देशानं पुण्यात तब्बल 10 किलो वजनाचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे चांदीचे पैंजण तयार करण्यात आले आहेत. काय आहे वैशिष्ट्य? पुण्यातले प्रसिद्ध ज्वेलर्स तेजपाल रांका यांची ही संकल्पना आहे. 5 कारागिरांनी तब्बल 2 महिने दिवसरात्र मेहनत करून हे पैंजण तयार केले आहे. या एका पैंजणाची किंमत तब्बल 8 लाख 50 हजार रुपये इतकी आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पैंजण आहे. अधिक महिन्याच्या निमित्तानं दहा किलो वजनाचं हे पैंजण आम्ही बनवलंय. नव्या पिढीला आपली संस्कती चांगल्या पद्धतीनं समजावी. त्यासाठी त्यांच्यासमोर एक वेगळी वस्तू आम्ही घेऊन आलो आहोत. पोहे विकून तरुण कमवतात महिन्याला तब्बल 60 लाख रुपये, काय कमाईचा फॅार्म्युला लहान बाळापासून ते मोठ्या महिलांपर्यंत पायात चांदीचं पैंजण घालण्याची प्रथा आपल्याकडं आहे. हे पैंजण चांदीचं असावं यामागे सौंदर्याबरोबरच आरोग्याचाही उद्देश आबे. चांदींचं पैंजण घातल्यानं स्त्रियांना आरोग्याचे वेगवेगळे फायदे मिळतात, अशी आपली समजूत आहे. पैंजण आणि भारतीय संस्कृती याकडं जगाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ही निर्मिती केलीय,’ असं त्यांनी सांगितलं. हे देशातलं दुसरं तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पैंजण आहे.यामध्ये सेमी प्रेशियस स्टोनचा वापर करण्यात आलाय. याची किंमत 8 लाख 50 हजार आहे, अशी माहितीही रांका यांनी दिली.