‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका #PGStory. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव. ही गोष्ट आहे नंदा रस्तोगीची. नंदा दिल्लीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत सीनिअर पदावर कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती दिल्लीत राहते. या काळात तिने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. पुण्यात जवळपास तीन वर्षं काढल्यानंतर मला दिल्लीतून एक चांगली ऑफर आली होती. बिलकुल वेळ न दवडता मी ती स्वीकारली. चांगलं पॅकेज आणि घरापासून जवळ असे दोन्ही फायदे असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला ही ऑफर भन्नाट वाटली होती. नवा जॉब मिळाल्याच्या आनंदात मी जरा लवकरच जागी झाले. पहाटेचे साडेपाच वाजले होते. माझ्यासाठी हा आश्चर्याचा मोठा धक्का होता, कारण गेल्या कित्येक वर्षांत एवढ्या पहाटे मी कधीच उठले नव्हते. आता कुठे मध्यरात्र झालीय, असा विचार करत मी पुन्हा झोपायचं ठरवलं. दुसऱ्या कुशीवर वळत पाय चादरीच्या आत घेतले आणि गुरफटून झोपी गेले. दुसऱ्यांदा मोबाईलमध्ये अलार्म वाजला तेव्हा घड्याळात सकाळचे नऊ वाजले होते. मी खाडकन जागी झाले आणि बेडवरून उठले. माझं ऑफिस होतं साडेनऊचं. घरापासून ऑफिसला पोहोचायला कमीत कमी 20 मिनिटं तरी लागणारच होती. आता मी ऑफिसला कशी वेळेत पोहोचणार? डोक्यात अनेक प्रश्न तयार झाले होते आणि मी नुसतीच रूममध्ये येरझाऱ्या घालू लागले. मग मी अंघोळीला दांडी मारली आणि पटापट कपडे घालून ऑफिससाठी बाहेर पडले.
शुद्ध औषधी मसाला म्हणजे काळी मिरी; यामुळेच इंग्रजांचा 200 वर्षे ‘गुलाम’ राहिला भारतघाई होती आणि आनंदही होता. आनंद या गोष्टीचा होता की आज ऑफिसात जाऊन मी राजीनामा देणार होते आणि माझा नोटिस पीरियड सुरू होणार होता. मला दिल्लीतून एक मोठी ऑफर आल्याचं मी ऑफिसमध्ये जाहीर करणार होते. नेहमीपेक्षा अर्धा तास उशिरा मी ऑफिसमध्ये पोहोचले. पोहोचल्या पोहोचल्या थेट कामाला लागले. काही वेळानं बॉस फ्री असल्याचं दिसल्यावर त्यांना भेटून ही खुशखबर दिली. हे ऐकून बॉसनाही आनंद झाला. त्यांनी लागलीच फेअरवेलची तारीखही निश्चित करून टाकली.
पुढच्या 15 दिवसांनी माझं फेअरवेल होतं. त्याच रात्री माझी फ्लाईटही होती. माझं सामान तर मी आधीच पॅक केलं होतं. घरी आले, थोडा आराम केला आणि एअरपोर्टला पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासात माझ्या विमानानं उड्डाण केलं आणि दिल्लीत पोहोचले.
दिल्लीत माझी रुममेट होती अंकिता. आपली कॉलेजची मैत्रिण अर्चिता आणि काही मित्रांसह पार्टीचा बेत आखला होता. मी तयार झाले. मी आणि अंकिता हौज खास या ठिकाणी पोहोचलो. तिथं अंकिताची मैत्रिण अर्चिता, तिचा बॉयफ्रेंड रोहित आणि त्यांचा जावेद नावाचा मित्र अगोदरच पोहोचले होते. आम्ही हौजखासमध्ये मनसोक्त फिरलो आणि नंतर ड्रिंक्सही घेतले. त्यानंतर लाऊड बिट्सवर अऩेक तास डान्स केला. त्यानंतर आम्ही सगळे घरी आलो, बराच वेळ गप्पा मारत मारत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही तयार झालो आणि आपापल्या ऑफिसला गेलो. संध्याकाळी आम्ही जेवण करत असताना अंकिताने मला अर्चिताविषयी सांगितलं. अर्चिताच्या रुममेटचं लग्न झाल्यामुळे ती एकटी पडली असून तिला आपल्या रुमवर राहायला येण्याची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं. मी अर्चिताला नुकतीच भेटले होते. त्यामुळे मी होकार दिला.
एक दिवस अंकिताच्या ऑफिसमध्ये पार्टी होती. त्यासाठी ती तिचा एक खास ड्रेस शोधत होती, पण तिला सापडत नव्हता. तिनं तिच्या आणि माझ्याही कपाटात पाहिलं, पण तो सापडलाच नाही. शेवटी, दुसराच एक ड्रेस घालून ती पार्टीला गेली. पार्टीच्या दुसऱ्या दिवशीदेखील अंकितानं पूर्ण घरभर ड्रेस शोधला, पण तो सापडलाच नाही. त्यानंतर तिनं ड्रेस सापडण्याची आशाच सोडून दिली आणि हताश होऊन बसून राहिली. त्यानंतर काही दिवसांनी मलाही आमच्या ऑफिसमध्ये एकाच्या वेलकम पार्टीसाठी जायचं होतं. त्यासाठी मी माझा पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून जाणार होते. मात्र त्या वेळी माझा तो ड्रेस मला सापडलाच नाही. मी अंकिताला विचारलं तर तिनं तिची कथा सांगितली. तिचा एक रेड ड्रेस, एक यलो टॉप आणि दो स्कर्ट सापडत नव्हते. पूर्ण घरभर शोधलं. आम्ही दोघीही हा विचार करू लागलो की आपले कपडे कुठं गायब होत असतील? त्यानंतर अंकिताच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला आणि तिनं एक कल्पना सुचवली. ती म्हणाली आपण अर्चिताची बॅग तपासून पाहूया. मी म्हणाले की तू वेडी झालीयस का? त्यावर ती म्हणाली की तू शांत बस आणि कुलूप तोडण्याचा प्रयत्न कर. मग मी गप्प बसले आणि दोघींनी मिळून तिच्या बॅगेचं कुलूप तोडायला सुरुवात केली. बराच वेळ प्रयत्न करूनही कुलूप तुटलं नाही. मग आम्ही हळूहळू त्या ट्रॉली बॅगेची चेन फाडली. चेन फाटल्यानंतर त्या बॅगेत वरच आमचे कपडे दिसायला लागले. ते पाहून आम्हा दोघींनाही धक्का बसला. मी विचारलं, आपले ड्रेस हिच्या बॅगेत कसे गेले? त्यावर ती म्हणाली की तिनं आपले कपडे चोरले आहेत. कुणी असे कपडे कसं चोरू शकतं? या विचारात मी पडले. मात्र अंकिताचं म्हणणं खरं होतं. आमचे जे जे ड्रेस घरभर शोधूनही सापडत नव्हते, ते सगळे अर्चिताच्या बॅगेत सापडले. त्यानंतर आम्ही दोघी प्रचंड रागावलो होतो आणि अर्चिता घरी येण्याचीच वाट पाहत होतो. रात्री ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत घरी आली. आम्ही तिला तिच्या बॉयफ्रेंडसमोर काहीच बोललो नाही. जेव्हा तो गेला, तेव्हा आम्ही तिला विचारलं की आमचे ड्रेस तुझ्या बॅगेत काय करत आहेत? त्यावर ती म्हणाली की आमचे हे कपडे बाहेर पडले होते आणि घाण होत होते. त्यामुळेच आपण ते बॅगेत भरून ठेवले. अंकिता आणखी रागावली. ती म्हणाली की जर घाण होत होते, तर स्वतःच्या बॅगेत ठेवण्याची काय गरज होती? त्यावर तुम्ही माझ्यावर संशय घेताय का, असा सवाल अर्चितानं केला. अंकिता म्हणाली की संशय नव्हे, तर खात्रीच आहे, तू ड्रेस चोरल्याची. मग त्या दोघींचे यावरून प्रचंड वाद झाले, भांडणं सुरू झाली. तेवढ्यात तिचा बॉयफ्रेंड रोहित त्याचा विसरलेला मोबाईल घ्यायला रुमवर परत आला. त्यानं अंकिता आणि अर्चितामध्ये सुरू असलेलं भांडण ऐकलं आणि आपल्या गर्लफ्रेंडनं कपडे चोरल्याचं ऐकून त्यालाही धक्का बसला. त्यानंतर आम्ही अर्चिताला आमच्या घरातून निघून जायला सांगितलं. अर्चिताचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याचंही आम्हाला लवकरच समजलं.