JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना काळात कशी होती सेक्स लाइफ; दाम्पत्यांनी शेअर केल्या सिक्रेट गोष्टी

कोरोना काळात कशी होती सेक्स लाइफ; दाम्पत्यांनी शेअर केल्या सिक्रेट गोष्टी

कोरोनाकाळात अनेक जोडप्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. मात्र अनेकांचं नातं नव्यानं बहरलंसुद्धा.

जाहिरात

Infertilityचा त्रास महिलांबरोबर पुरूषांमध्येही असू शकतो. मेडिकल एक्सपर्टनुसार लैंगिक शिक्षण आणि जागृकताही महत्वाची असते. बऱ्याचदा जोडपे योग्य वेळी शारीरिक संबंध करत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 फेब्रुवारी : लॉकडाऊननं (lock down) जगभरातील लोकांचं जगणं विस्कळीत केलं. उद्योग-व्यवसाय, नोकऱ्या, सामाजिक जीवन, कौटुंबिक गोष्टी काहीच कोरोनाच्या (corona) प्रभावातून सुटू शकलं नाही. लोकांचं लव्ह (love) आणि सेक्स लाईफ (sex life) तरी याला अपवाद कसं असेल? Dailymail नं दिलेल्या वृत्ता नुसार, ‘Whisper’ नावाच्या वेबसाईटनं (website) लॉकडाऊन काळात लोकांचं सेक्स लाईफ कसं बऱ्या-वाईट पद्धतीनं बदललं याचा वेध घेतला. या वेबसाईटनं लोकांना निनावी पद्धतीनं अनुभव शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांनी लोकांना आपल्या स्टोरीज एक-दोन ओळीत लिहून मागितल्या. लोकांनी याला भरभरून प्रतिसाद देत वैविध्यपूर्ण परिणाम समोर ठेवले. आपल्या प्रेम आणि सेक्सबाबत नक्की काय घडलं याच्या अगदी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या कथा (stories) लोकांनी खुलेपणानं सांगितल्या. एक जोडपं सांगतं, ‘आम्ही लॉकडाऊनच्या काळात एरवीपेक्षा पाचपट अधिक सेक्स केला.’ दुसरा एकजण म्हणतो, ‘मला माझ्या बायकोचा इतका जास्त वैताग आणि कंटाळा आला, की आम्ही कायम वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायला लागलो.’ अजून एका पुरुषानं आपण या काळात विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केले असल्याचीही कबूली दिली. तो सांगतो, ‘मी पूर्वीपेक्षा जास्त सेक्स करतो आहे. मला एक चांगली सेक्स पार्टनर (sex partner) मिळाली आहे. आणि बायकोला याची अजिबातच कल्पना नाही.’ अजून एकजण अतिशय निराश शब्दात कबुली देतो, की सेक्स तर लांबच राहिला पण अगदी एकमेकांशी बोलणंही आम्हाला शक्य होत नाही आहे. नात्यात  (relationship) खूप ताण (stress) निर्माण झाला आहे.’ हे ही वाचा- 29 लाख घेतले मात्र कार्यक्रमात आलीच नाही; सनी लिओनी विरोधात पोलिसात तक्रार एका महिलेनं मात्र सेक्सपलीकडं जात तिच्या आयुष्यातली घटना सांगितली आहे. ती म्हणते, ‘मी नुकतीच आई (mother) झाल्यानं सध्या तरी सेक्स करण्याची इच्छा अजिबातच होत नाही. मात्र मी आनंदी आहे कारण माझा जोडीदार एक वडील (father) म्हणून अतिशय समंजसपणे आपली भूमिका निभावतो आहे.’ तुम्हीही सांगा, कशी होती लॉकडाऊन काळात तुमची सेक्स लाईफ?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या