कोची, 6 फेब्रुवारी : सनी लिओनी (Sunny Leone) म्हणजे गूगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक. सनी सतत कुठल्या न कुठल्या कारणानं चर्चेत असते. आता एका वादग्रस्त कारणानं ती चर्चेत आली आहे. केरळ पोलिसांनी (Kerala Police) शुक्रवारी संध्याकाळी अभिनेत्री सनी लिओनीची एका प्रकरणासंदर्भात चौकशी केली. सनी लिओनीवर एक आरोप लावण्यात आला आहे. प्रकरण असं आहे, की कोचीमध्ये दोन कार्यक्रमांमध्ये (programs) येण्याचं कबूल करूनही सनी आली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. शिवाय हेही त्यात नोंदवलं आहे, की तिनं त्यासाठी 29 लाख रुपये अॅडव्हान्स (advance) घेतले होते. मात्र ती कार्यक्रमस्थळी पोचलीच नाही. हे ही वाचा- ‘Mirzapur’ मधील सासरा-सूनेच्या अनैतिक संबंधावर स्थानिकांची तीव्र नाराजी याबाबत आता सनीनं पोलिसांसमोर आपली बाजू मांडली आहे. आर.शियस या माणसानं सनीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत (complaint) म्हटलं आहे, की सनीसोबत दोन इव्हेंट्समध्ये (events) सहभागी होण्यासाठी 29 लाख रुपयांचा करार केला गेला होता. मात्र ती कार्यक्रमांना आलीच नाही. सनीतर्फे बाजू मांडणाऱ्या व्यक्तीनं मात्र ही रक्कम 12 लाख होती आणि ती परत दिली जाईल असं कळवलं आहे. सध्या सनी केरळमध्ये सुट्ट्यांचा (vacation) आनंद घेते आहे. तिनं केरळ पोलिसांसमोर आपली बाजू मांडतांना सांगितलं, की कोरोनाच्या (corona) कारणामुळे तिला कार्यक्रमांना उपस्थित राहता आलं नाही. शिवाय ती हेसुद्धा म्हणाली, की कार्यक्रम पाच वेळा पुढं ढकलण्यात आला. आणि यासाठी आयोजक जबाबदार आहेत. येत्या काळात सनी अनामिका नावाच्या वेब सिरीजमध्ये (web series) दिसणार आहे. या वेब सिरीजला विक्रम भट्ट (Vikram Bhatt) दिग्दर्शित (direct) करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.