JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Optical Illusion : केवळ बुद्धिमान व्यक्तीच देऊ शकतात या कोड्याचं उत्तर; 9 सेकंदांमध्ये ओळखा चूक

Optical Illusion : केवळ बुद्धिमान व्यक्तीच देऊ शकतात या कोड्याचं उत्तर; 9 सेकंदांमध्ये ओळखा चूक

Optical Illusion : स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्यांनी नक्कीच हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करावा. 9 सेकंदांमध्ये हे कोडं सोडवलं, तर तुमची बुद्धिमत्ता चांगली आहे असं समजायला हरकत नाही.

जाहिरात

केवळ बुद्धिमान व्यक्तीच देऊ शकतात या कोड्याचं उत्तर; 9 सेकंदांमध्ये ओळखा चूक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी : आपला मेंदू आणि नजर यांच्या कुशलतेची तपासणी करायची असेल, तर ऑप्टिकल इल्युजनची कोडी हा चांगला पर्याय ठरतो. काही कोडी बुद्धीचा कस पाहणारी असतात, तर काही कोडी नजरेची फसगत करणारी असतात. असं म्हणतात, की अशा कोड्यांमुळे बुद्धी आणखी तल्लख होते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही अशी कोडी सोडवू शकतं. सध्या व्हायरल होणारं कोडं बुद्धीशी निगडित आहे असं वाटेल; मात्र त्यात नजरेला धोका देणारी गोष्टही आहे. स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्यांनी नक्कीच हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करावा. 9 सेकंदांमध्ये हे कोडं सोडवलं, तर तुमची बुद्धिमत्ता चांगली आहे असं समजायला हरकत नाही. ऑप्टिकल इल्युजनचं हे कोडं गणिताचं असेल असं वाटतं. कारण त्यात काही आकडे दिले आहेत. त्यात असलेली एक चूक वाचकांना शोधायची आहे. हे आकडे 4-4च्या सेटमध्ये लिहिलेले आहेत आणि त्यातूनच एक चूक शोधायची आहे. वरवर पाहता त्यात काहीच चूक नाही असं वाचकांना वाटू शकेल; पण तुम्ही तर्कनिष्ठ बुद्धिमत्तेनं विचार केला तर कदाचित या कोड्याचं उत्तर तुम्हाला सापडू शकेल. वाचकांना हे कोडं सोडवण्यासाठी 9 सेकंदांचा वेळ देण्यात आलाय; मात्र तुम्ही थोडा अधिक वेळ विचार करून अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता. हेही वाचा:   कोटींमध्ये पगार, राहायला आलिशान घर, तरीही याठिकाणी लोकांना नकोय नोकरी हे कोडं सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही. ज्यांना अजूनही उत्तर सापडलं नाही, त्यांच्यासाठी एक हिंट म्हणजे ती चूक आकड्यांच्या शेवटच्या सेटमध्ये आहे. ते आकडे काळजीपूर्वक पाहिल्यास ती चूक नक्कीच लक्षात येऊ शकते. नाहीच आढळली, तर सोबत दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. शेवटी दिलेल्या 4 शून्यांमध्ये एक आकडा नसून ओ (O) हे इंग्रजी अक्षर आहे. ते शोधण्यासाठी खरोखरच चाणाक्ष नजर आणि बुद्धिमत्ता असण्याची गरज आहे.

ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांचा उपयोग निरीक्षणशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. एका चित्रात दिसणाऱ्या किती गोष्टींचं निरीक्षण केलं जातं, कोणकोणत्या गोष्टी आधी पाहिल्या जातात, यांचा अभ्यास करून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तपासलं जातं. मानसोपचार थेरपीमध्येही याचा वापर केला जातो. रुग्णाचं व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी याची मदत घेतली जाते. ऑप्टिकल इल्युजनची काही कोडी फोटोंच्या माध्यमातून तयार केलेली असतात, तर काही कोडी वेगवेगळी नक्षी, आकार, रंगसंगती यांचा वापर करून तयार केलेली असतात. यात डोळ्यांना वरवर दिसणारं चित्र आणि वस्तुस्थिती यात फरत असू शकतो. हीच या चित्रांची गंमत असते. अशी जास्तीत जास्त कोडी सोडवल्यामुळे बुद्धी तल्लख होते. तसंच मनोरंजनही भरपूर होतं. त्यामुळेच ऑप्टिकल इल्युजनची कोडी भरपूर व्हायरल होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या