JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Valentine's Day Special : ही फर्म घटस्फोट मिळवून देण्यासाठी करणार मोफत मदत, खर्चही नाही!

Valentine's Day Special : ही फर्म घटस्फोट मिळवून देण्यासाठी करणार मोफत मदत, खर्चही नाही!

Valentine’s Day 2021 : या जोडप्याने घटस्फोटाचा कोणताही खर्च करायचा नसून यासाठी या फर्मने एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

जाहिरात

ऑफिसमधून घरी परत यायला उशीर होणार असेल तर, पत्नीला त्याची कल्पना आधीच द्या. पत्नीला न सांगता बाहेर फिरत राहणं, उशीरा घरी पोहोचणं, फोन केल्यानंतर न उचलणं या गोष्टींमुळे पत्नीच्या मनात संशय निर्माण होतं आणि रिलेशन खराब व्हायला लागतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमेरिका, 4 फेब्रुवारी : अनेकदा घटस्फोट (Divorce) घेणाऱ्या जोडप्याला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. घटस्फोट हा केवळ जोडप्यांमध्ये होत असून याचा परिणाम मुलांच्या जीवनावर देखील पडतो. पण अमेरिकेतील एक फर्मने येत्या व्हॅलेंटाईन डेला (Valentine’s Day) वैवाहिक जीवनात आनंदी नसणाऱ्या जोडप्यांना मोफत घटस्फोट मिळवून देण्याची ऑफर ठेवली आहे. यामध्ये या जोडप्याने घटस्फोटाचा कोणताही खर्च करायचा नसून यासाठी या फर्मने एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत विजेते ठरणाऱ्या जोडप्यांच्या घटस्फोटाचा सर्व खर्च ही फर्म करणार आहे. अमेरिकेतील टेनेसीमधील ‘The Powers’ नावाच्या लॉ फर्मने ही स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेतील एका विजेत्या जोडप्याच्या घटस्फोटाचा सर्व खर्च ही फर्म करणार आहे. यामध्ये लीगल चार्जेसबरोबर न्यायालयीन फी देखील ही फर्म देणार आहे. यासंदर्भात या फर्मने फेसबुकवर एक पोस्ट केली असून कोरोनाच्या या संकटकाळात आम्ही चांगली सुवर्णसंधी देत आहोत. वैवाहिक जीवनात ते सुखी नाहीत परंतु या कठीण काळात ज्यांना घटस्फोटाचा (Divorce) हा खर्च परवडणारा नाही. त्यांच्यासाठी आम्ही ही खास ऑफर आणल्याचं यामध्ये लिहिलं आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी आम्ही तुमचा घटस्फोट करून देण्यात मदत करणार असल्याचं देखील यामध्ये म्हटलं आहे. केवळ टेनेसीमधील जोडपीच या स्पर्धेत सहभाग घेऊ शकणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे यासाठी या जोडप्यांना घटस्फोट (Divorce) का घ्यायचा आहे हे मेल करून सांगायचं आहे. यामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार असून त्यानंतर एका विजेत्या जोडप्याला मोफत घटस्फोट करून देण्यात ही फर्म मदत करणार आहे. 19 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) च्या दिवशी लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यामध्ये केवळ दोघांच्या घटस्फोटाचा खर्च ही फर्म करणार असून लहान मुलांचा यामध्ये समावेश असल्यास याचा अतिरिक्त खर्च दोघांना द्यावा लागणार आहे. हे देखील वाचा -  25 लाख एअरटेल ग्राहकांचा डेटा लीक? कंपनीने दिलं असं स्पष्टीकरण दरम्यान, या लॉ फार्ममधील सल्लागार टिमोथी सेक्स्टन (Timothy Sexton) यांनी सीएनएन (CNN) बरोबर बोलताना घटस्फोट खूप महाग झाल्याचं म्हटलं आहे. अनेक जोडप्याना हा खर्च परवडत नसल्यानं त्यांना लग्नाच्या बेडीत अडकून पडावं लागत असल्याचं म्हटलं आहे. याचा खर्च खूप असून साधारणपणे 1,150 डॉलर्सपासून याची सुरुवात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या