श्रीनगर, 3 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीर सर्कलमधील सुमारे 25 लाख भारती एअरटेल ग्राहकांच्या डेटासह आधार नंबर, पत्ता, जन्मतारीख हॅकर्सकडून लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु टेलिकॉम कंपनीने सर्व्हरमध्ये अशाप्रकारे कोणतंही उल्लंघन झाल्याचं नाकारलं आहे. सीएनबीसी टीव्ही 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, लीक झालेल्या डेटाबेसचं सॅम्पल सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी ट्वीटरवर शेअर केलं आहे. या शेअर केलेल्या डेटाबेसमध्ये ग्राहकांचे तपशील दर्शवण्यात आले आहेत. राजहारिया यांनी आणखी एका ईमेलचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमधून भारती एअरटेल आणि हॅकर्सच्या रेड रॅबिट टीममधीस संभाषण शेअर करण्यात आलं आहे.
व्हिडीओमध्ये या हॅकर्सनी भारती एअरटेलला डिसेंबरमध्ये झालेल्या उल्लंघनाविषयी, लीकबाबत माहिती देत पैशांची मागणी केली होती. या हॅकर्सनी त्यांच्याकडे संपूर्ण देशाच्या एअरटेल युजर्सचा डेटा असल्याचा दावा केला आहे. परंतु त्यांनी केवळ 25 लाख जम्मू-काश्मीर एअरटेल युजर्सचा डेटा अपलोड केल्याची माहिती आहे. हॅकर्सनी एअरटेल सर्व्हरमध्ये शेल अपलोड केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Strange! @airtelindia already aware about this alleged breach since last 3 months. Hacker posted all email conversations with airtel too. They also posted POC video. What steps taken to remove and patch? I am also an Airtel Subscriber.🙁#InfoSec #DataLeak #GDPR #databreaches pic.twitter.com/Tdu9mMMIOW
— Rajshekhar Rajaharia (@rajaharia) February 2, 2021
कोरोना काळात अनेक कंपन्या सुरक्षेबाबत लक्षकेंद्रीत करू शकल्या नाही आणि त्यांच्या डेटाचा भंग झाल्याचं राजहारिया यांनी म्हटलं आहे. हॅकर्सनी एका वेबासाईटवर डेटा अपलोड केला होता. परंतु नंतर ते हा डेटा ऍक्सेस करू शकले नाहीत. याबाबत एअरटेल प्रवक्तांशी संपर्क साधला असता, त्यांनी कंपनीच्या सर्व्हरमध्ये कोणतंही उल्लंघन झाल्याची बाब नाकारली आहे. एअरटेलने आपल्या ग्राहाकांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. या प्रकरणातही डेटा लीक झाला नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे.