नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : फिटनेस चांगला राखण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक तास व्यायाम करतात. कारण, लठ्ठपणा हा आरोग्यासाठीही हानिकारक आहे. शरीराच्या लठ्ठपणामुळे तुम्ही अनेक आजारांनाही बळी पडू शकता. त्यामुळे पोटाची चरबी कमी करून तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात नाश्त्याचाही महत्त्वाचा वाटा असतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्लीम राहायचे असेल तर तुम्ही नाश्त्यामध्ये काही गोष्टी (Weight Control Tips) अजिबात घेऊ नये. प्रक्रिया केलेले अन्न - प्रक्रिया केलेले अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेतून अनेक वेळा गेलेले असते. तसेच तेल, मसाले, तूप यांचे प्रमाणही त्यामध्ये जास्त असल्याने तेही आरोग्यासाठी चांगले नसते. यासाठी तुम्ही चिप्स, पॉपकॉर्न, ड्रायफ्रुट्स, स्नॅक्स इत्यादीपासून दूर राहावे. नूडल्स- नूडल्स खायला खूप छान असतात, पण त्याला हेल्दी ब्रेकफास्ट मानता येत नाही. या कारणास्तव, तुम्ही न्याहारीमध्ये नूडल्स अजिबात खाऊ नये. त्यांचे सेवन केल्याने वजन वाढू शकते. हे वाचा - FB पेपर लीकमधून मोठा खुलासा, Facebook वरुन कमी होतेय तरुणांची संख्या, वाचा काय आहेत कारणं फळांचा रस (ज्युस) - बाजारात मिळणारा फळांचा रस अजिबात न पिण्याचा प्रयत्न करा, त्याऐवजी घरच्या घरी फळांचा रस काढून पिऊ शकता. जर तुमच्याकडे ज्यूसऐवजी फळ खाण्याकडे वेळ असेल तर ते नाश्त्यासाठी सर्वोत्तम असेल. हे वाचा - लोकांची नखं कापून करोडपती बनली ही महिला; फक्त नेलपेंट लावण्यासाठीच घेते इतकी रक्कम पकोडे, समोसा - तळलेले पदार्थ सकाळी लवकर खाणे अजिबात योग्य नाही. जर तुम्ही सकाळी पकोडे, कचोरी यासारखे तळलेले पदार्थ खाल्ले नाहीत तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, जर तुम्ही सकाळी पकोडे किंवा समोसे असे पदार्थ खाल्ले तर अशा परिस्थितीत तुमचे वजन वाढू शकतं. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. (या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)