JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / NonVeg खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता मटन-मांस खाल्ल्यानंतर अ‌ॅलर्जी होण्याचा धोका

NonVeg खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता मटन-मांस खाल्ल्यानंतर अ‌ॅलर्जी होण्याचा धोका

लोकांना मांसाहार केल्यानंतर अ‌ॅलर्जी (meat allergy) झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. विशेषत: जे लोक लहानपणापासून मटन-मांस खातात त्यांना ही समस्या जास्त जाणवते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : जे मांसाहारी आहेत आणि मटनाचे विविध पदार्थ मोठ्या आवडीनं खातात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लोकांना मांसाहार केल्यानंतर अ‌ॅलर्जी (meat allergy) झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. विशेषत: जे लोक लहानपणापासून मटन-मांस खातात त्यांना ही समस्या जास्त जाणवते. मात्र, अनेकांनी मांसाहार केल्यानं अ‌ॅलर्जी असल्याचे क्वचितच ऐकले असेल. अनेक डॉक्टरांनासुद्धा याबाबत माहिती नाही. पण आता नवीन संशोधनानंतर हे स्पष्ट झाले आहे की मांसाहारामुळे अ‌ॅलर्जी (allergy) देखील होते आणि त्याच्या वेगवेगळ्या कारणांचा सध्या अभ्यास चालू आहे. अमेरिकेत अशी काही प्रकरणं डॉक्टरांकडे आली, ज्यात असं म्हटलं जात होतं की त्यांना मांसाहारी खाल्ल्यानंतर अ‌ॅलर्जीची लक्षणं जाणवत आहेत. आधी डॉक्टरांना सुद्धा ही लक्षणं समजत नव्हती, पण नंतर असे आढळून आले की मांसाहारी खाण्यामुळे त्यांना समस्या होती आणि त्यांना मांसाहाराची अ‌ॅलर्जी होती. अ‌ॅलर्जी का होते? DW च्या अहवालानुसार, एक प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर देखील या प्रकरणाबद्दल आश्चर्यचकित झाले. अहवालात सांगण्यात आले की, ‘रुग्ण आधी मांस खात असत आणि नंतर त्यांच्या शरीरात एक रिअ‌ॅक्शन होती, पण त्याला काहीच अर्थ नव्हता. पण, दुसर्‍या एका प्रकरणात, अल्फागल नावाची अ‌ॅलर्जीच्या रुग्णाच्या तपासणीत छोटी लहान कणांची प्रतिपिंडे आढळली. अल्फागलच्या तपासणीवरून प्रतिपिंडे अ‌ॅलर्जीची लक्षणे नोंदवली गेली आहेत. हे वाचा -  अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचां बलात्कार; तिच्या आईनेही सांगितला थरकाप उडवणारा प्रकार अहवालात असे सांगण्यात आले आहे की अल्फागल केवळ औषधांमध्येच वापरला जात नाही, तर त्याचा वापर प्राण्यांच्या मांसामध्येही केला जातो. हे उघड झाले की मांसासाठी देखील अ‌ॅलर्जी असू शकते. अशा परिस्थितीत असे होऊ शकते की जर तुम्ही मांसाहार खाल तर तुम्हाला ही अ‌ॅलर्जी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. हे वाचा -  घरात सहज वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत भयंकर धोकादायक; परिणामांबद्दल वाचून बसेल धक्का मात्र, ही प्रकरणे अमेरिकेच्या भागात अधिक येत आहेत, जिथे बेडबगसारखे दिसणारी अळी आढळते आणि यामुळे अ‌ॅलर्जीची शक्यता अधिक वाढते. असे म्हटले जाते की अल्फागल देखील या अळीच्या मदतीने मानवी शरीरात जातो, ज्यामुळे अ‌ॅलर्जीची शक्यता वाढते, त्यामुळे पुढील संशोधनापर्यंत भारतीयांना घाबरण्याची गरजही नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या