JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Lunar Eclipse 2020: आजच्या ग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम?

Lunar Eclipse 2020: आजच्या ग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम?

आज रात्री होणाऱ्या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवर चांगला प्रभाव पडणार आहे जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जून : ज्येष्ठ पौर्णिमेला छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण म्हणजे खगोलशास्त्रज्ञांसाठी ही पर्वणी अआहे. रात्री सव्वाअकरावाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि उत्तररात्री अडीचच्या सुमारात चंद्र छायेतून पूर्ण बाहेर येईल. या चंद्रग्रहणाचा राशींवर काय प्रभाव पडणार आणि त्यावेळी प्रत्येक राशीतील व्यक्तींना काय समस्या येऊ शकतात  याविषयी ज्योतिर्विद्या तज्ज्ञांनी वर्तवलेलं भविष्य… मेष - चंद्रग्रहण आपल्या कुंडलीतील आठव्या स्थानी असेल. त्यामुळे आपल्याला आरोग्याची अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. तणामुक्त जीवन जगण्याकडे लक्ष केंद्रीत करा. वृषभ- जोडीदारासोबत आपले संबंध अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करावा लागेल. गैरसमजापासून दूर राहा. मिथुन- वादविवाद होणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कर्क- आपल्या मनात नकारात्मक विचार वाढतील, परिणामी आपण ताणतणाव आणि थकवा जाणवेल. योग आणि व्यायामाची गरज आहे. सिंह - भूतकाळातील समस्या त्रास देऊ शकतात. कौटुंबीक वाद सोडवण्यासाठी उत्तम वेळ. आरोग्याबद्दल अधिक जागरुक राहा. कन्या- आपल्या आर्थिक जीवनावर सर्वाधिक परिणाम होईल. तुम्हाला काम पूर्ण करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे, यामुळे ते वेळेवर पूर्ण करण्यात तुम्हाला अपयशी ठरू शकतात. तुळ- कामाच्या ठिकाणी आपल्याकडून चुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहून चतुराईनं काम करावं. वृश्चिक- आपण आपल्या प्रतिमेबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतही काळजी घ्या कारण वाहन चालकांनी गाडी चालवताना सावधगिरी बाळगा. धनु- आपली परिस्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. घाईनं गुंतवणूक करू नका. मकर- हा वेळ आपल्यासाठी खूप शुभ असेल. व्यस्त असाल तरीही आपला वेळ चांगला जाईल. प्रिय व्यक्तींना वेळ देणं आवश्यक आहे. कुंभ- अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. कोणतीही जोखीम पत्करू नका. मीन- यावेळी तुमची कार्य क्षमता वाढेल, यामुळे तुम्ही तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्यास सक्षम असाल – अन्य बातम्या खरंच पुरुष आपल्या मानसिक समस्या आणि भावना लपवतात का? मुलं चिडचिडी आणि रागिष्ट झालीत; असू शकतो मानसिक आजार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या