खरंच पुरुष आपल्या मानसिक समस्या आणि भावना लपवतात का?

खरंच पुरुष आपल्या मानसिक समस्या आणि भावना लपवतात का?

पुरुष आपल्या मानसिक समस्यांबाबत (Male mental health problem) कुणाशी बोलत नाहीत, असं बोललं जातं.

  • Share this:

मुंबई, 03 जून : पुरुष (male) आपल्या मनातलं काही बोलत नाहीत, आपल्या भावना व्यक्त करत नाही, त्यांना कोणत्या मानसिक समस्या होत आहेत ते सांगत नाही. असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र खरंच महिलांच्या तुलनेत पुरुष आपल्या मानसिक समस्या लपवतात का, मानसिक समस्यांबाबत (mental health problem) कुणाशी बोलत नाहीत का?

माय उपचारने याबाबत फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य विभागाचे डॉ. समीर पारिख यांच्याशी बातचित केली.

डॉ. पारिख यांनी सांगितलं, "मानसिक आरोग्याचं लिंगानुसार वर्गीकरण करू शकत नाही. मानसिक आरोग्य हे त्या व्यक्तीची स्थिती आणि कारणांवर अवलंबून असतं. संबंधित व्यक्ती कोणत्या व्यक्तींसह राहते, तिथली परिस्थितीत यावर ती व्यक्ती आपल्या मानसिक आरोग्यासंबंधी इतर व्यक्तींशी बोलेल की नाही हे अवलंबून असतं. जर आजूबाजूचं वातावरण रूढीवादी, नकारात्मक, भेदभावपूर्ण असेल तर ती व्यक्ती लोकांकडे लोकांकडे मदत मागण्यात किंवा आपलं म्हणणं मांडण्यात कचरते. अशा परिस्थितीचा त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो"

मानसिक आजाराची लक्षणं काय आहेत?

निराश राहणे

लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होणे

जास्त भीती आणि चिंता

अपराधीपणाची भावना वाटणे

मित्र, समाजापासून दूर राहणं

वास्तविकतेपासून दूर जाणं

दैनंदिन समस्या, तणावाचा सामना करण्यात असमर्थता

जास्त राग येणं, हिंसक व्यवहार

हे वाचा - योनीमार्गातील खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं इन्फेक्शनचं लक्षण

"एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या असल्यास तिला वाटतं परस्पर संबंध, घर किंवा ऑफिसचं काम, आपले विचार आणि भावना यामुळे ती मानसिक आजाराचे शिकार होत नाही. इतकंच नव्हे तर समस्या वाढत गेल्यास तिला याबाबत मदतीची गरज असते. सामान्यपणे अशा समस्यांचं निराकारण त्या व्यक्ती स्वत: किंवा मित्र, नातेवाईकांच्या मदतीने करतात. जर इतके प्रयत्न करूनही जर तुम्ही मानसिक समस्यातून बाहेर पडत नसाल तर तज्ज्ञ औषधं आणि समुपदेशन करून उपचार करतात. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात, ज्यामुळे तुम्ही या समस्येतून लवकरात लवकर बाहेर पडू शकतात", असा सल्ला डॉ. पारिख यांनी दिला आहे.

हे वाचा - हर्निया होणं म्हणजे नेमकं काय? काय आहेत त्यामागील कारणं वाचा

First published: June 3, 2020, 10:35 PM IST

ताज्या बातम्या