मुंबई, 12 फेब्रुवारी : लहान मुलं म्हटली की खेळणी, कपडे किंवा आपल्या आवडीच्या वस्तूसाठी रडतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशा चिमुरडीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. जी कोणत्या वस्तूसाठी नाही तर चक्क नवऱ्यासाठी रडते (Girl Crying For Husband) आहे. माझा नवरा कुठे आहे, मला नवऱ्याकडे जायचं आहे, असं ती रडत आईला सांगते. या चिमुरडीच्या या क्युटनेसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. @vkvkmarwat ट्विटर युझरनं या चिमुकलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक मुलगी जमिनीवर निराश बसली आहे. ती रडताना दिसत आहे. तिची आई तिला याचं कारण विचारते. तेव्हा ती आपल्याला नवऱ्याकडे जायचं असल्याचं सांगतं.
चिमुकली म्हणजे मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे. तेव्हा तिची आई तिला विचारते कोण आहे तुझा नवरा तेव्हा ती मामा असं म्हणते. तिची आई तिला सांगते मामा तर मामीचा नवरा आहे. हे वाचा - अक्ल बड़ी या भैंस? माणसांच्या प्रश्नांना अखेर म्हशीनंच दिलं उत्तर; पाहा हा VIDEO मग चिमुरडी आणखी जोरजोरात रडू लागते आणि विचारते विचारते माझा नवरा कुठे आहे मग. तिची आई तेव्हा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते. तुझा नवरा कुठेतरी खेळत असेल. पण तो आता नाही भेटणार. लहान मुलांचा नवरा नसतो. त्यांचे भाऊ-बहीण असतात. तरी मुलगी काही ऐकायला तयार होत नाही. ती आपली जिद्द धरूनच बसते. हे वाचा - ‘आता मी चंद्रासारखे दिसेन’, म्हणत तरुणीनं फेस मास्क हटवला आणि दिसला भयंकर चेहरा मुलीचा हा क्युटनेस पाहून आणि तिचं असं रडणं पाहून आपल्याला मात्र हसू आवरत नाही. हा व्हिडीओ शेअर करतानादेखील ही मुलंसुद्धा ना… कोण समजावेल यांना असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हल्ली लहान मुलांना मोठं होण्याची घाई असल्याचं म्हटलं आहे. तर एकान या रडणाऱ्या मुलीनं सोशल मीडियावर सर्वांना हसवलं. खूप क्युट मुलगी आहे, असं तिचं कौतुकही केलं आहे.