जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अक्ल बड़ी या भैंस? माणसांच्या प्रश्नांना अखेर म्हशीनंच दिलं उत्तर; पाहा हा VIDEO

अक्ल बड़ी या भैंस? माणसांच्या प्रश्नांना अखेर म्हशीनंच दिलं उत्तर; पाहा हा VIDEO

अक्ल बड़ी या भैंस? माणसांच्या प्रश्नांना अखेर म्हशीनंच दिलं उत्तर; पाहा हा VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी : ‘अक्ल बड़ी या भैंस’ हा प्रश्न तुम्ही ऐकलाच असेल. प्रत्येकाकडून या प्रश्नाचं उत्तर वेगळं आलं असेल तर काही जणांना याचं उत्तरच माहिती नसेल. अखेर माणसांच्या या प्रश्नांना खुद्द म्हशीनंच (Buffalo) उत्तर दिलं आहे. या म्हशीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. आयपीएस अधिकारी पंकज जैन यांनी आपल्या ट्विरवर एका म्हशीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिला एका खुंटीला बांधून ठेवण्यात आलं आहे. यातून ती सुटण्याचा प्रयत्न करते आणि यशस्वीदेखील होती.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता, म्हशीच्या गळ्यात साखळी आहे. जी एका खुंटीत अडकवण्यात आली आहे. म्हशीली तिथून हलायचं आहे. पण कसं. एरवी प्राण्यांना असं बांधलेलं असेल तर आपल्या गळ्यातील दोरा किंवा साखळीसह ती खुंटी किंवा खांब खेचण्याचा प्रयत्न करतात. ही म्हैसही असंच काही करेल असं वाटलं. पण घडलं उलटंच. हे वाचा -  4 वाघांनी घेरलं पण एकाच्याही तावडीत नाही सापडलं; बदकाच्या हुश्शारीचा VIDEO VIRAL म्हशीनं शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर केला. अगदी हुशारीनं ती आपली सुटका करते. आपल्या गळ्यात आणि खुंटीला अडकवलेली साखळी ती आपल्या तोंडात धरते आणि ती साखळी खुंटीतून बाहेर काढते. साखळी तिच्या गळ्यात राहते आणि खुंटीपासून तिची सुटकाही होती. डोकं लढवून म्हैस स्वतःला बंधनातून मुक्त करून घेते. हे वाचा -  आता माझी सटकली! मान पकडताच कोंबड्याचा कुत्र्यावर हल्लाबोल; खतरनाक Fighting Video ‘हे त्यांच्यासाठी आहे, जे म्हणतात अक्ल बड़ी या भैंस’, असं मजेशीर कॅप्शनही पंकज जैन यांनी या व्हिडीओला दिलं आहे.  हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही. यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. म्हशीच्या हुशारीला सर्वांनी दाद दिली आहे. तिचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात