'आता मी चंद्रासारखे दिसेन', म्हणत तरुणीनं फेस मास्क हटवला आणि दिसला भयंकर चेहरा

'आता मी चंद्रासारखे दिसेन', म्हणत तरुणीनं फेस मास्क हटवला आणि दिसला भयंकर चेहरा

सुंदर दिसण्यासाठी तरुणीनं घरगुती उपाय केला पण तिच्या चेहऱ्याची काय अवस्था झाली ती तुम्हीच पाहा.

  • Share this:

एडिनबर्ग, 10 फेब्रुवारी : आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक तरुणीला वाटतं. त्यामुळे चेहऱ्यावर एखादं जरी पिंपल आलं तरी ते घालवण्यासाठी धडपड सुरू होते. आपला चेहरा पिंपल्स, रिंकल्स फ्री, डाग नसलेला, नितळ, सुंदर, टवटवीत कसा ठेवावा यासाठी मग इंटरनेटवर उपाय शोधले जातात. महागड्या कॉस्मेटिक्सपेक्षा घरच्या घरी काहीतरी ब्युटी प्रोडक्ट बनवून वापरण्याकडे अनेकांचा कल असतो. पण अनेकदा काहीतरी कमी जास्त होतं आणि मग हा उपाय फसतो. त्यावेळी नेमकं काय होतं, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video)  होतो आहे.

सौंदर्य म्हटलं की हळद आवर्जून येतेच आणि एका स्कॉटिश मुलीनं (Scottish Girl) इंटरनेटवर पाहून याच हळदीचा फेसपॅक (Turmeric Pack) तयार केला आणि चेहऱ्यावर लावला. ज्याचा तिनं टिकटॉक व्हिडीओ (TikTok Video) बनवला. या व्हिडीओत नेमकं काय झालं आहे ते तुम्हीच पाहा.

लॉरेन जे रिनी असं या तरुणीचं नाव आहे. व्हिडीओ तिनं चेहऱ्यावर हळदीचा फेस पॅक लावल्याचं दिसतं आहे.  लॉरेन म्हणाली, गेल्या तीन आठवड्यांपासून माझी त्वचा खूप खराब झाली होती. चेहऱ्यावर स्पॉट्स आले होते. विशेषतः ओठांजवळ. मला ते फोडायचे नव्हते कारण खूप वेदना होतात. मी इंटरनेटवर सर्च करून यावर उपाय शोधळा. हळदीचा फेस मास्क. हळदीपासून तयार करण्यात आलेला हा घरगुती फेसमास्क पिंपल्स, रिंकल्स, निस्तेज त्वचा आणि त्वचेची जळजळ अशा अनेक समस्यांपासून मुक्ती देतं. हा पॅक वापरून पाहावा म्हणून मी किचनमध्ये गेले आणि हळदीचा पॅक तयार करून चेहऱ्यावर लावला.

हे वाचा - Teddy Day 2021: वाचा पहिल्या टेडी बिअरच्या जन्माची कथा

जेव्हा मी हा फेस पॅक काढेन तेव्हा चंद्रासारखी दिसेन. असं म्हणून तिनं फेसपॅक हटवला आणि चेहरा चंद्रासारखा नाही पण पिवळा धमक दिसू लागला. जेव्हा तिनं फेसपॅक लावला तेव्हा हात पिवळे पडू लागले. तेव्हाच काहीतरी चुकीचं होतं आहे हे तिला समजलं.

त्यानंतर तिनं आपला नवा व्हिडीओ टाकला ज्यात तिचा चेहरा एकदम असल्याचं दिसतं आहे. असा चेहरा मिळवण्यासाठी खूप स्क्रब करावं लागल्याचंही तिनं सांगितलं. सोबतच आता आपली त्वचा कोमलही झाल्याचं ती म्हणाली.  पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

हे वाचा - एकता कपूरनं लग्न केलं? रुग्णालयातील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

अनेकदा सोशल मीडियावर असे बरेच ब्युटी हॅक असतात. पण ती योग्य पद्धतीनं सांगितले न गेल्यानं किंवा अर्धवट सांगितलेले असल्यानं त्याचे असे परिणाम दिसून येतात.

Published by: Priya Lad
First published: February 10, 2021, 8:42 PM IST

ताज्या बातम्या