नवी दिल्ली, 03 डिसेंबर : सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय तुमचं खूप नुकसान करू शकते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं लठ्ठपणा आणि तणावाची समस्या निर्माण होते. शिवाय, अनेक वर्षं ही सवय राहिल्यास अल्सरसारखे गंभीर आजारही होऊ (Bed Tea Side Effects) शकतात. ‘झी न्यूज’ने दिलेल्या बातमीनुसार चहामध्ये कॅफिन, एल-थेनाइन आणि थिओफिलिन सारखे घटक असतात. हे तुम्हाला नक्कीच सक्रिय बनवतात. परंतु, यामुळं अनेक रोगांचा धोका वाढतो. बेड टीच्या (Bed Tea) सवयीमुळे डोकेदुखी, स्नायूंचं दुखणं, सांधेदुखी आणि अस्वस्थता येऊ शकते. झी न्यूजनं याविषयी माहिती दिली आहे. पचनाशी संबंधित समस्या आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं (बेड टी साइड इफेक्ट्स) पित्त रस तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. यामुळं मळमळ आणि अस्वस्थता येऊ शकते. बेड टी घेतल्याने पचनक्रिया नीट होत नाही. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, पोट फुगणे आणि पोटात जळजळ होऊ शकते. अल्सर होण्याचा धोका अनेक वर्षं रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीमुळे अल्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमची ही सवय बदलली पाहिजे. हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक हाडांना नुकसान रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय हाडांना इजा करते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं शरीरातील वातदोष वाढतो. त्यामुळं हाडं कमकुवत होतात. यामुळे तुम्हाला कमी वयात सांधेदुखीचा सामना करावा लागू शकतो. तणावाचं कारण चहा आणि कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने राग, चिडचिड आणि तणाव वाढू शकतो. हे वाचा - तुम्हीही प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात खाता ना? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात रक्तदाब रुग्णांसाठी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप नुकसानकारक ठरते. चहामध्ये कॅफिनचं प्रमाण खूप जास्त असतं. सकाळच्या चहामध्ये असलेलं कॅफिन शरीरात झपाट्यानं विरघळतं. यामुळं हृदय गती आणि रक्तदाबावर परिणाम होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)