JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / BMD Test : हाडांच्या त्रासाचे निदान होईल 25 मिनिटात; या चाचणीतून होणार सर्व खुलासा

BMD Test : हाडांच्या त्रासाचे निदान होईल 25 मिनिटात; या चाचणीतून होणार सर्व खुलासा

Bone Mineral Density (BMD) Test: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सांधेदुखी ही खूप सामान्य समस्या बनली आहे. केवळ वृद्ध लोकच नव्हे तर तरुणांनाही हाडे दुखण्याचा त्रास होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सांधेदुखी ही खूप सामान्य समस्या बनली आहे. केवळ वृद्ध लोकच नव्हे तर तरुणांनाही हाडे दुखण्याचा त्रास होत आहे. मात्र, बहुतेक लोक चांगल्या डॉक्टरकडे जाण्याऐवजी घरात उपचार करत राहतात आणि नंतर समस्या आणखीनच (Bone Mineral Density (BMD) Test) वाढत जाते. नेमकी समस्या जाणून घेण्यासाठी आपल्याला हाडांची तपासणी करणे आवश्यक आहे. हाडांची ताकद आणि वेदनांचे कारण शोधण्‍यासाठी तुम्ही बोन मिनरल डेन्सिटी (BMD) चाचणी करू शकता. ही चाचणी काय आहे आणि कोणाला ही चाचणी करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया. बीएमडी टेस्ट म्हणजे काय? हाडांची ताकद तपासण्यासाठी बोन मिनरल डेंसिटी(BMD) चाचणी केली जाते. या चाचणीद्वारे ड्युअल एनर्जी क्ष-किरण शोषक (DEXA) मशीनच्या मदतीने हाडांची घनता तपासली जाते. यासोबतच हाडांच्या कमकुवतपणाचे कारण शोधले जाते. या चाचणीद्वारे हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांची माहिती मिळते. या चाचणीद्वारे ऑस्टियोपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारखे हाडे कमकुवत करणारे आजारही शोधता येतात. हे वाचा -  Winter Health Tips : सूर्यप्रकाशात कधीही उभं राहाल तर व्हिटॅमिन डी मिळतं असं नाही; जाणून घ्या योग्य वेळ ही चाचणी कोणी करून घ्यावी? विशेषत: पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी, रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रिया, लहान वयात गर्भाशय काढून टाकलेल्या महिलांसाठी बीएमडी चाचणी करणे आवश्यक आहे. पण ज्या लोकांच्या हाडांमध्ये अनेकदा वेदना होतात. थकवा आणि अशक्तपणा लवकर जाणवतो, अशा लोकांनाही ही चाचणी करून घ्यावी. यासोबतच जे लोक बऱ्याच काळापासून स्टिरॉइड्स किंवा अँटीसायकोटिक औषधे घेत आहेत, त्यांनी देखील ही चाचणी करावी. मेटाबॉलिक हाडांच्या आजाराच्या रुग्णाला ही चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हे वाचा -  Basil Seeds : तुळशीच्या पानांपेक्षाही बिया असतात जास्त गुणकारी, रोज खाल्ल्यानं मिळतील हे जबदस्त फायदे वेदनारहीत चाचणी बीएमडी चाचणी ही एक वेदनारहित चाचणी आहे, जी जवळपास वीस-पंचवीस मिनिटांमध्ये होते. ही चाचणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या आहाराची गरज नाही. मात्र, ही चाचणी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून घेणं योग्य ठरते. यासोबतच गर्भवती महिलांना त्यांच्या गर्भधारणेची माहितीही चाचणीपूर्वी सांगावी लागेल. जेणेकरून डेक्सा मशिनमधून निघणाऱ्या रेडिएशनच्या प्रभावापासून त्यांना वाचवता येईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या