JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / VIDEO - फक्त एका रबरने एकाच वेळी कापा भरपूर भाज्या; झटपट भाजी चिरण्याची सर्वात सोपी ट्रिक

VIDEO - फक्त एका रबरने एकाच वेळी कापा भरपूर भाज्या; झटपट भाजी चिरण्याची सर्वात सोपी ट्रिक

रबरच्या मदतीने कमीत कमी वेळेत पटापट भरपूर भाजी चिरण्याची पद्धत एका गृहिणीने दाखवली आहे.

जाहिरात

फोटो सौजन्य - यूट्युब व्हिडीओ स्क्रिनशॉट.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 मे : अनेकांना स्वयंपाक करायला आवडतो पण स्वयंपाकाची तयारी नकोशी वाटते. कापणं, चिरणं कुणी तरी करून देईल तर बरं होईल असं वाटतं. सर्वात कटकटीचं वाटतं ते भाजी चिरणं. काही भाज्या चिरण्यात इतका वेळ जातो की त्या वेळेत स्वयंपाक बनून तयार होईल. त्यामुळे सकाळी डब्याला भाजी करायची असेल तर त्याची तयारी रात्रीच करून ठेवली जाते. पण आता भाज्या चिरण्याची फार कटकटच नाही. कारण अगदी कमीत कमी वेळेत तुम्ही भरपूर भाज्या कापू शकता, त्यासुद्धा फक्त रबरने. आतापर्यंत तुम्ही सुरी, विळा, चॉपर याने भाजी कापली असेल पण कधी रबरने भाजी कापून कापली आहे का? फक्त एका रबरने तुम्ही एकाच वेळी भरपूर भाज्या कापू शकता. झटपट भाजी चिरण्याची ही सर्वात सोपी अशी ट्रिक आहे. जी एका गृहिणीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

आपली आई-आजी यांच्यासारख्या कित्येक गृहिणी ज्यांच्याकडे अशा छोट्या-मोठ्या किचन टिप्स असतात. अगदी वेळखाऊ, मेहनतीचं कामही त्या अगदी सहजसोप्या पद्धतीने करून दाखवतात. अशाच गृहिणींपैकी एकीने आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलेला भाजी चिरण्याच्या पद्धतीचा हा व्हिडीओ. ज्यात तिने एका रबरच्या मदतीने कमीत कमी वेळेत भरपूर आणि झटपट भाजी कशी चिरायची हे दाखवलं आहे. स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावा आणि काही सेकंदातच काय कमाल होते पाहा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ती एक चॉपिंग बोर्ड घेते. या बोर्डखाली ती काही रबर पसरवते, त्यावर हा बोर्ड ठेवते आणि भाजी कापते. बऱ्याचदा तुम्ही चॉपिंग बोर्डवर भाजी चिरताना तो बोर्ड हलतो आणि मग भाजी कापण्यात अडचण येते. शिवाय चाकू हाताला लागण्याचीही भीती असते. पण या पद्धतीमुळे बोर्ड हलणार नाही आणि भाजीही पटापट चिरता येईल. पुढे या व्हिडीओत भाजीला रबर लावून ती चिरून दाखवण्यात आली आहे. भेंडीसारखी भाजी जी बुळबुळीत असते, ती चिरताना हातातून निसटते, ज्यामुळे चिरण्यातही वेळ जातो. अशा भाजीला एकत्र करून त्याच्या वरच्या टोकावर एक रबर लावा आणि दुसऱ्या हातात चाकू घेऊन ती भाजी कापा. यामुळे भाजी पटापट चिरता येते. 30 सेकंदात सोला एक वाटी लसूण; खूप भारी किचन हॅक, तुम्ही आजच करा ट्राय! इंडियन व्लॉगर पिंकी युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

तुम्हाला रबरने भाजी चिरण्याचा हा जुगाड कसा वाटला आणि तुम्ही भाजी चिरण्यासाठी असा कोणता जुगाड वापरता का?, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या