चुटकीसरशी करा स्वच्छ चहाची गाळणी, वापरा या टीप्स
मुंबई, 15 जुलै: चहा गाळण्यासाठी तुम्ही ज्या गाळणीचा वापर करता त्यात अनेकदा घाण अडकून राहते. ही गाळणी स्वच्छ करणे वेळा कठीण होऊन बसते. यासाठी शेफ पंकज भदोरिया यांनी काही सोप्या टिप्स शेअर सांगितल्या आहेत. या टिप्स वापरून तुम्ही काही सेकंदात गाळणी स्वच्छ करू शकता. पंकज भदोरिया यांची टीप्स शेफ पंकज भदोरिया यांनी सांगितले की, तुम्ही चहाची स्टीलची गाळणी गरम करून स्वच्छ करू शकता. यासाठी गाळणी थोडा वेळ गॅसच्या आचेवर ठेवा आणि गरम होऊ द्या. यामुळे चाळणीत अडकलेली घाण जळून राख होईल. नंतर गाळणी थंड करा आणि सामान्य डिशवॉशने स्क्रब करून स्वच्छ पाण्याने धुवा. इतर घरगुती टिप्स बेकिंग सोडा वापरू शकता चहाची गाळणी साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा.त्यात चहाची गाळणी भिजवा. 3 ते 4 तासांनंतर गाळणीवर डिशवॉश लिक्विड लावा आणि ब्रश किंवा स्क्रबने घासून घ्या. यामुळे गाळणी ताबडतोब स्वच्छ आणि वासमुक्त होईल. पांढरा व्हिनेगर वापरा तुम्ही पांढऱ्या व्हिनेगरच्या मदतीने गाळणी सहज स्वच्छ करू शकता. यासाठी पांढऱ्या व्हिनेगरमध्ये चहाची गाळणी भिजवावी आणि 3-4 तासांनी गाळून स्वच्छ पाण्याने धुवावी. गाळणी खूप घाण असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ती पांढऱ्या व्हिनेगरमध्ये भिजवा. सकाळी उठल्यावर चाळणी घासून स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे गाळणी नवीन आणि चमकदार दिसेल. ब्लीच वापरा चहाची गाळणी साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच देखील वापरू शकता. यासाठी १ कप पाण्यात ¼ कप ब्लीच घ्या आणि त्यात गाळणी भिजवा. याच्या 20 मिनिटांनंतर ब्रशने घासून गाळणी स्वच्छ धुवा. यानंतर चहाच्या गाळणीवर डिशवॉश लिक्विड लावा आणि सामान्य पद्धतीने धुवा. यामुळे गाळणी सहज स्वच्छ होईल आणि चहाचा वास देखील गाळणीतून येणार नाही.