मुंबई, 11 मार्च : साधे धगधगते निखारे बाजूला असले तरी आपली काय अवस्था होते ते माहितीच आहे आणि ज्वालीमुखीचा (lava) फक्त व्हिडीओ जरी पाहिला तरी अंगाला घाम फुटतो. मग अशा ज्वालामुखीजवळ जाण्याची हिंमत कुणाची होणार? पण अशी हिंमत करून दाखवली ती करीनानं. धगधगत्या ज्वालामुखीवरून ती गेली आणि तिनं या डेअरिंगचा वर्ल्ड रेकॉर्डही केला. ब्राझीलची एडवेंचरर असलेली करीना ओलियानी (Karina Oliani). जिनं ज्वालामुखीवरून जाण्याचं चॅलेंज स्वीकारलं. इथियोपियातील (Ethiopia) लावा लेक (Lava Lake) तिनं पार केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अफार प्रांतातील एर्टा आले हा ज्वालामुखी. जिथं लाव्हा सतत वाहतच असतो. यामुळे लाव्हाची नदीच तयार झाली आहे. इथं जगातील सर्वात जास्त तापमान असतं. पृथ्वीवरील हा सर्वात उष्ण भाग असल्याचं सांगितलं जातं. हे वाचा - बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक याच ज्वालामुखीच्या बरोबर वर एक दोरी बांधण्यात आली आणि या दोरीवरून करीनानं हा ज्वालामुखी पार केला. तिनं विशेष प्रकारचं सूट, हेल्मेट घातलं होतं आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडरही होता. ज्वालामुखीपासून 329 फीट 11.7 इंच उंचावरून ती गेली. ती जेव्हा तिथून जात होती तेव्हा तिथलं तापमान तब्बल 1187 डिग्री सेल्सियस होतं. हे वाचा - OMG! चक्क हवेत उडू लागली कासवं; दुर्मिळ VIDEO पाहण्याची संधी बिलकुल सोडू नका करीनाचा हा व्हिडीओ पाहून अक्षरश: धडकीच बसते. ज्वालामुखीवरून ती जाते आहे पण घाम आपल्याला शरीराला फुटतो आहे. तिच्या या साहसाची दखल जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये तिची नोंद झाली आहे.
GWR च्या मते, करीनाला एर्टा आले ज्वालामुखीवरून जायचं होतं. पण तिथं किती धोका आहे हे तिला माहिती नव्हतं. पण तिला आवश्यक ते सर्व साहित्य पुरवण्यात आलं.