मुंबई, 11 मार्च : कासव (tortoise) म्हणजे अगदी संथ गतीनं चालणारं. ज्याला साधं जमिनीवरही वेगानं चालता येत नाही. ते कासव चक्क हवेत (flying tortoise) उडू लागलं असं सांगितलं तर साहजिकच कुणाचाच विश्वास बसणार नाही. कासव (turtle) म्हटलं की जमिनीवर लुटूलुटू चालणारं. ते हवेत उडू लागलं म्हणजे तुम्हाला अतिशयोक्तीच वाटेल. पण हे खरं आहे. सध्या अशाच हवेत उडणाऱ्या सोनेरी कासवांचा (golden tortoise beetles) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गोल्डन आणि हवेत उडणाऱ्या या कासवांनी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हैराण होत आहे. किंबहुना व्हिडीओ पाहिल्यानंतरही कुणाचा त्यावर विश्वास बसत नाही आहे. व्हिडीओत पाहू शकता हे कासवं म्हणजे सोन्याचे असावेत असंच वाटतं. शिवाय जसे चमकणारे काजवे हवेत उडतात. अगदी तसेच हे सोनेरी कासवही हवेतही उडत आहेत.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये याबाबत काही माहितीही दिली आहे. ते म्हणाले, अनेकदा चमकतं तेच सोनंच असतं. हे बीटल दक्षिण पूर्व आशियात सापडले आहेत. हे वाचा - 4 लाखांना विकला गेला दुर्मिळ Smiley अजगर; काय आहे त्याच्यावरील स्माईलीचं रहस्य लोकांनी पहिल्यांदाच या गोल्डन टॉरटॉइझ बीटल्सना पाहिलं. आता त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता अधिक वाढली आहे.