One of the HSC exam centre in Bhave School Sadashiv Peth on the first day of the exams. Express Photo by Sandip Daundkar,21.02.2018, Pune
मुंबई, 29 जानेवारी: दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला अधिक वेगानं अभ्यास करायचा असतो. अशावेळी आपल्याला सगळं पुस्तक वाचणं शक्य नसतं मात्र काही छोट्या टिप्स तुम्ही केल्यात तर आपला अभ्यास कमी वेळात अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. 5R या तत्वाचा वापर करून अभ्यास करा. Research- आपल्याला काय कठीण जातं हे शोधून काढा. त्यावर रनिंग छोट्या पॉकेट नोट्स तयार करा. Read- आपल्याला कठीण जाणारा भाग अथवा विषय पुन्हा पुन्हा वाचा remind- वाचलेल डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा. Rwrite- त्यानंतर कागदावर मुद्दे लिहून काढा Review- आपलं उत्तर बरोबर आले की नाही हे पुन्हा तपासून पाहा. रनिंग नोट्स, पॉकेट नोट्स कशा काढाल गणितातील सूत्र किंवा भाषा आणि साहित्यातील महत्त्वाचे मुद्दे डोळ्यासमोर कायम रहावेत यासाठी पॉकेट नोट्सचा वापर होतो. त्यासाठी तुम्ही नोट्स काढायला हव्या. त्या तुमच्या शब्दाद आणि लक्षात राहतील अशा असाव्यात. चालता फिरता उठता बसता फक्त पुढचे काहीदिवस आपला अवघड जाणाऱ्या विषयातील न येणारा भाग आठवून पाहण्याचा प्रयत्न करा. पुढचे काही दिवस वेळेचं चोख नियोजन करा खाणं, जेवणं, झोपणं आणि अभ्यास करणं याचा वेळा ठरवून घ्या. दिवसातील किमान 1 तास हा खेळ अथवा व्यायाम 1 तास तुमचा आवडता छंद जोपासण्यासाठी द्या. त्यामुळे तुमचं मन आणि मेंदू दोन्ही प्रसन्न राहिल. घोकंपट्टीवर भर नको महत्त्वाचे मुद्दे आपल्या भाषेत लिहून काढा. घोकंपट्टी केल्यानं मुद्दे अथवा विषय विसण्याची भीती राहाते. त्यामुळे एकदं वाक्य किंवा शब्द विसला तर पुढंचं काहीही आठवत नाही. त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करून लिहू काढा आणि आपल्या भाषेत पेपरमध्ये मांडा. गणिताची सूत्र, विज्ञानातील सूत्र आणि आकृत्या जशाच्या तशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसातील 1 तास मेडिटेशन आणि रिव्हिजन संपूर्ण दिवसाचा अभ्यास झाल्यानंतर आज आपण दिवसभरात काय केलं. किती केलं आणि कशापद्धतीनं केलं याचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. मेडिटेशनमुळे मन शांत आणि स्थिर होतं. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. हेही वाचा- Board Exams 2020: पेपर सोडवताना योग्य पद्धतीनं Time management कसं कराल? हेही वाचा- UPSC : कंडक्टरचा कलेक्टर होण्याच्या दिशेनं प्रवास, आता उरलाय एकच स्टॉप!