Board Exams 2020: पेपर सोडवताना योग्य पद्धतीनं Time management कसं कराल?

Board Exams 2020: पेपर सोडवताना योग्य पद्धतीनं Time management कसं कराल?

पेपरला वेळ पुरत नाही असं अनेक विद्यार्थ्यांचं मत असतं. पण काही विद्यार्थ्यांचे पेपर वेळेत सोडवून होतात मग आपला का नाही? तर त्याचं उत्तर आहे वेळेच्या नियोजनाची कमतरता

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी: दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहेत. अशावेळी आपला अभ्यास पूर्ण होऊन सराव प्रश्न पत्रिका सोडवण्याकडे अधिक विद्यार्थी भर देत असतात. काही जणांचा पेपर वेळेत पूर्ण होतो तर काही जणांना वेळेअभावी पेपर सुटतो किंवा सोडावा लागतो. मग अशावेळी परीक्षेसाठी पेपर लिहिताना सर्वात महत्त्वाचं असतं ते वेळेचं गणित जमवणं. वेळेत पेपर नीट पूर्ण लिहून झाला तर समाधानही मिळतं. परीक्षेसाठी वेळेचं मॅनेजमेंट कसं कराल? हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी-मार्च महिना खूप महत्वाचा आहे. यावेळी एखाद्याला बोर्ड परीक्षेची तयारी करावी लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना घरी आणि परीक्षा हॉलमध्ये दोन्ही वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. जर विद्यार्थ्यांनी हे केले असेल तर ते चांगले गुण मिळवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगणार आहोत जे परीक्षेच्या वेळेचे व्यवस्थापन करण्यात मदत करतील.

प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ द्या

परीक्षा हॉलमध्ये बसल्यानंतर तुमच्या हातात प्रश्नपत्रिका आली की पहिली 15 मिनिटं पेपर पूर्ण आणि शांतपणे वाचा. त्यामध्ये कुठे चुका नाहीत ना? कोणता प्रश्न किती मार्कासाठी आहे आणि किती प्रश्नांपैकी आपल्याला सोडवायचे आहेत. याचा शांतपणे विचार करा. यामध्ये तुम्हाला अचूक येणारे प्रश्न किती आहेत याचा विचार करा आणि मग पेपर सोडवण्यास सुरुवात करा. कठीण प्रश्नांना नंतर प्राध्यान्य द्या. त्यामुळे तुमचा अधिक वेळ जाणार नाही. सोप्यापासून अवघड अशा क्रमानं पेपर सोडवायला सुरुवात केली तर किमान तुम्हाला जे येत आहे त्याचे पूर्ण मार्क मिळण्याची शक्यता अधिक असते.

अचूक लिहिण्याची सवय लावा-

बोर्डाच्या परीक्षेमध्ये अचूक आणि सुटसुटीत छान लिहा. जितकी खाडाखोड आणि नको असलेला फापटपसारा लिहिण्यात आपला वेळ वाया जातो. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी नमुनेपत्रे, सराव पेपर्स आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत त्या वेळ लावून सोडवायला हव्यात. त्यामुळे आपला सराव देखील चांगला होईल आणि आपल्या लेखनाचा वेग देखील वाढेल. कोणताही पेपर सोडवण्यापूर्वी एखादा वेळ निश्चित करा, कोणत्या वेळी तुम्ही किती मिनिटात प्रश्न सोडवाल याचं परीक्षण स्वत:च करणं आवश्यक आहे.

परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका नीट वाचा आणि त्यानंतर उत्तर लिहायला सुरुवात करा. जे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला नक्की माहिती आहेत ते प्रश्न आधी सोडवा. प्रश्नांचे क्रमांक चुकवू नका. त्यामुळे तुमचे मार्क जाण्याचा धोका असतो.

प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी वेळ सेट करा

प्रत्येक प्रश्नासाठी वेळ सेट करून घ्या. ती वेळ संपल्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जा. उदा. आपण प्रश्नासाठी 15 मिनिटे सेट केली आहेत असे आपल्याला वाटत असल्यास, आपण ते 15 मिनिटांच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या प्रश्नात अधिक वेळ घेतला असेल तर कदाचित दुसरा प्रश्न अर्धवट राहू शकतो किंवा कमी लिहिला जाऊ शकतो. तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नांमध्ये अधिक वेळ घालवू आणि शेवटी असेही होऊ शकते की आपल्याकडे वेळ शिल्लक नाही. त्यामुळे नियोजन करणं गुणांच्या दृष्टीनंही हिताचं ठरेल.

First published: January 27, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या