JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Kitchen Tips : किचन सिंक वारंवार तुंबतं? मग हा पदार्थ टाका आणि चमत्कार पाहा

Kitchen Tips : किचन सिंक वारंवार तुंबतं? मग हा पदार्थ टाका आणि चमत्कार पाहा

किचन सिंक तुंबण्याची समस्या प्रत्येक घरत केव्हा न केव्हा होत असते. तेव्हा सिंकमध्ये पाणी तुंबल्यावर घरगुती उपाय करून ते कस साफ करावं हे जाणून घेऊयात.

जाहिरात

किचन सिंक वारंवार तुंबतं? मग हा पदार्थ टाका आणि चमत्कार पाहा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनेकदा खरकटी भांडी किचन सिंकमध्ये धुतल्याने त्यातील लहान मोठे पदार्थांचे कण सिंकच्या पाईपमध्ये अडकून राहतात. पाईपमध्ये उकडलेले कण जास्त झाले की त्यातून पाणी पास होत नाही आणि परिणामी किचन सिंक तुंबतात. अशावेळी प्लंबरला बोलावून खर्च केल्याशिवाय हा त्रास काही सुटत नाही. परंतु तुंबलेले किचन सिंक स्वच्छ करण्यावर घरगुती उपाय योग्य ठरू शकतात. किचन सिंकच्या स्वच्छतेसाठी कॉफी हा एक उत्तम घरगुती पर्याय आहे. जर तुमच्याकडे कॉफी पावडर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिक्विड सोप अथवा उकळत्या पाण्याचा देखील वापर करू शकता. जर किचन सिंकमधून पाणी बाहेर येत नसेल तर यात कॉफी पावडर आणि लिक्विड सोप घालण्याची आवश्यकता आहे.

तुंबलेले किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकींग सोडा हा उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही किचन सिंकमध्ये एक मोठा चमचा बेकिंग सोडा घाला आणि त्यावरून व्हिनेगर टाका. व्हिनेगर ऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता, यामुळे सिंकमधील घाण बाहेर येईल. Health : डायबेटीस असताना गर्भधारणेचा विचार करताय? मग या गोष्टींची घ्या खास काळजी आठवड्यातून एकदा किचन सिंकची स्वच्छता कारण गरजेचं आहे. यामुळे सिंक नेहमी स्वच्छ राहील आणि यात पाणी तुंबणार नाही. तसेच सिंक तुंबू नये यासाठी खरकटे काढूनच उष्टी भांडी त्यात टाका. तसेच सिंक ड्रेनच्या वरच्या वाजूस जाळी लावा यामुळे अन्नाचे कण पाईपमध्ये अडकणार नाहीत आणि सिंक तुंबण्याची समस्या निर्माण होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या