JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जोडीदाराची फसवणूक करताना पकडले गेले अन् आता पश्चाताप होतोय? या पद्धतीनं परत मिळवा नात्यातला विश्वास

जोडीदाराची फसवणूक करताना पकडले गेले अन् आता पश्चाताप होतोय? या पद्धतीनं परत मिळवा नात्यातला विश्वास

जोडीदाराची फसवणूक करताना पकडले गेल्यास तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टींमुळे तुमची चूक सुधारणार नाही. पण, माफी मागण्यास किंवा परिस्थितीचा सामना करण्यास नक्कीच मदत होईल.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 एप्रिल : जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची फसवणूक करत असाल आणि पकडला गेला असाल, तर तुम्ही त्याबद्दल फार डॅमेज कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही तिसऱ्या व्यक्तीसाठी जोडीदाराची फसवणूक केली ही वस्तुस्थिती तुम्हाला नैतिकदृष्ट्या चुकीचं ठरवते. जोडीदाराची फसवणूक करताना पकडले गेल्यास तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टींमुळे तुमची चूक सुधारणार नाही. पण, माफी मागण्यास किंवा परिस्थितीचा सामना करण्यास नक्कीच मदत होईल.

चूक मान्य करा जबाबदारी स्वीकारा: आपण केलेल्या कृत्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तुमच्या कृतीसाठी तुमचा जोडीदारच कसा जबबादार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करू नका. फसवणूक करण्याचं कोणतंही कारण असो तुम्ही त्याचा दोष जोडीदाराला देऊ नका. स्वत:ची चूक मान्य करा. मनापासून माफी मागा: जर तुमच्या जोडीदारानं तुम्हाला इतर कोणासोबत पकडलं तर मनापासून माफी मागण्याची तयारी ठेवा. तुमच्यामुळे जोडीदाराला झालेल्या वेदनांची तुम्हाला जाणीव आहे, हे तुमच्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला झालेल्या प्रकरणाचा पश्चाताप होत असून तुम्ही गोष्टी पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं जोडीदाराला दाखवून द्या. ऐकून घ्या: फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तुमचा जोडीदार संतापलेला असणं साहजिक आहे. त्यामुळे स्वत: बचावात्मक पवित्रा न घेता त्याचं म्हणणं ऐकून घ्या. त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी द्या. त्याचं म्हणणं आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिकपणे उत्तरं द्या: जे काही घडलं आहे, त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं देण्याची तयारी ठेवा. उत्तरं देताना तुमच्या जोडीदाराला जास्त मनस्ताप होईल, असे तपशील देणं टाळा. सहानुभूती दाखवा: फसवणूक झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीची मनस्थिती काय असू शकते, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी स्वत:ला तुमच्या जोडीदाराच्या जागी ठेवून बघा आणि सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला स्पेस द्या: फसवणूक झाल्यानंतर, झालेला प्रकार स्वीकारण्यासाठी तुमच्या जोडीदाराला वेळ पाहिजे असेल. त्यामुळे त्याची मनस्थिती समजून घेत त्याला स्पेस द्या. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा: जर तुम्हाला जोडीदाराचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवा. केलेली प्रॉमिसेस आणि कमिटमेंट्सचं पालन करा. काउन्सेलिंगचा आधार घ्या: प्रयत्न करूनही तुम्हाला तुमचं नातं पूर्ववत करण्यात अपयश येत असेल तर प्रोफेशनल काउन्सेलिंगचा आधार घ्या. काउन्सेलरच्या मदतीनं तुम्ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळू शकता. संयम ठेवा: कोणतीही विस्कळीत झालेली गोष्ट पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो. नातेसंबंधही याला अपवाद नाहीत. कोणत्याही नात्यामध्ये निर्माण झालेली तेढ नाहीशी होण्यासाठी वेळ लागतो, ही बाब लक्षात घेऊन संयम ठेवला पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या