JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Gas Cylinder : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक, कसं ओळखायचं? एका टॉवेलमुळे समजेल सिलेंडर रिकामा की भरलेला!

Gas Cylinder : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक, कसं ओळखायचं? एका टॉवेलमुळे समजेल सिलेंडर रिकामा की भरलेला!

अनेकदा जेवण बनवताना सिलेंडरमधील गॅस संपून जातो. अशावेळी घरी दुसरा भरलेला सिलेंडर नसला तर मोठी तारांबळ उडते. परंतु आता तुम्ही केवळ एक टॉवेल वापरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता.

जाहिरात

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक, कसं ओळखायचं?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सध्या अनेक घरांमध्ये जेवण शिजवण्यासाठी गॅस सिलेंडरचा उपयोग केला जातो. यावर जेवण शिजवणे खूप सोईस्कर पडते. परंतु अनेकदा जेवण बनवताना सिलेंडरमधील गॅस संपून जातो. अशावेळी घरी दुसरा भरलेला सिलेंडर नसला तर मोठी तारांबळ उडते. परंतु आता तुम्ही केवळ एक टॉवेल वापरून सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेऊ शकता. सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल खूप प्रभावी ठरू शकतो. यामुळे तुम्हाला आधीच समजेल की तुमचा गॅस लवकर संपणार आहे की नाही. सिलेंडरमधील गॅस तपासण्यासाठी ओल्या टॉवेलचा उपयोग : सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घेऊन तो सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यावर टॉवेल बाजूला काढून ठेवा.  मग टाकीचे निरीक्षण करा की टाकीचा कोणता भाग लवकर वाळत आहे तसेच कोणता भाग जास्त वेळ ओला राहतो.

सिलेंडरच्या टाकीवरील ओला आणि सुका भाग तुम्हाला सिलेंडरमधील गॅसची लेव्हल सांगतो. म्हणजे जो टाकीचा भाग लवकर कोरडा झाला आहे तेथे गॅस शिल्लक नाही किंवा संपला आहे. तसेच जो भाग ओला राहतो त्या लेव्हलपर्यंत गॅस शिल्लक आहे असे समजावे. Monsoon Tips : पावसाळ्यात घरभर माश्या भिरभिरतात? मग 1 सोपा उपाय हा त्रास करतील दूर घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये काही प्रमाणात लिक्विडसुद्धा असते. त्यामुळे सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही. पण त्याउलट ज्याभागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या