JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीही भेसळयुक्त दूध पीत आहात का? या सोप्या पद्धतीने आता घरीच तपासा

तुम्हीही भेसळयुक्त दूध पीत आहात का? या सोप्या पद्धतीने आता घरीच तपासा

फूड ऑफिसर रीना बन्सल यांनी लोकांना भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ शोधण्याची पद्धत सांगितली आहे.

जाहिरात

फाईल फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अरविंद शर्मा, प्रतिनिधी भिण्ड, 3 जुलै : आरोग्य चांगले राहावे, यासाठी दूध पिले जाते. मात्र, त्याच दुधाने तुमची तब्येत बिघडली तर तुम्हाला नक्कीच काळजी वाटेल. कारण सध्या बाजारात भेसळयुक्त दूध मिळत असल्याचे समोर आले आहे. भाव कमी करून नफा कमावण्यासाठी भेसळयुक्त दूध विकले जाते. तर केवळ दूधच नाही तर इतर खाद्यपदार्थांमध्येही भेसळ होण्याची भीती कायम आहे. मात्र, आता तुम्ही घेतलेले दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे, हे तुम्ही घरी बसूनच शोधू शकता. ते कसे याबाबत जाणून घ्या. फूड ऑफिसर रीना बन्सल यांनी लोकांना भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ शोधण्याची पद्धत सांगितली आहे. त्या म्हणाल्या की, सर्वसाधारणपणे खाद्यपदार्थात कोणतेही विदेशी घटक मिसळले किंवा त्यातून कोणतेही मौल्यवान पोषक तत्त्वे काढून घेतले तर त्याची गुणवत्ता कमी होते. काही वेळा दूध पिऊन आणि मावा खाल्ल्याने काहीजण आजारी पडतात. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ टाळण्यासाठी आणि अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी लोकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे.

याप्रकारे तपासा दूध - नैसर्गिक दुधात केमिकल आणि साबण यांसारख्या गोष्टी मिसळून भेसळयुक्त दूध बनवले जाते. सिंथेटिक दूध फक्त खराब चवद्वारे ओळखले जाऊ शकते. घासल्यावर साबण लागतो आणि गरम केल्यावर हे दूध पिवळे होते. हे दूध तापवल्यावर पिवळे पडते असे वाटत असेल तर त्यात भेसळ झाली आहे. याशिवाय जर तुम्हाला अजूनही शंका येत असेल तर अर्धा कप दुधात समान प्रमाणात पाणी टाका, थोडे ढवळला. यानंतर जर तुम्हाला फेस दिसला तर दुधात डिटर्जंटची भेसळ आहे, असे समजा. दुधात वनस्पति तूप तपासण्यासाठी तीन मिलिलिटर दुधात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे 10 थेंब आणि एक चमचा साखर घाला. यानंतर पाच मिनिटांनी दुधाचा रंग लाल झाला तर त्यात वनस्पति तुपाची भेसळ आहे. दुधात स्टार्चची भेसळ तपासण्यासाठी टिंचर आयोडीनचे काही थेंब दुधात टाका. दुधाचा रंग निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ असते. सिंथेटिक दूध ओळखण्यासाठी, तळहातांमध्ये दूध घासून घ्या. जर ते साबणासारखे दिसत असेल तर ते सिंथेटिक असू शकते, असेही त्यांनी सांगितले. तसेच फूड ऑफिसर रीना बन्सल यांनी सांगितले की, आम्ही भेसळ करणार्‍यांवर सातत्याने कारवाई करत आहोत. तरीही तुम्हाला दुधात काही गडबड दिसली, तर तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करा. भेसळ करणाऱ्यांबाबत माहिती असल्यास तुम्ही तक्रार नोंदवू शकता, असे त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या