JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / MASK नाही घातला तर काय? VIDEO पाहाल तर तुम्ही चेहऱ्यावरील मास्क कधीच हटवणार नाहीत

MASK नाही घातला तर काय? VIDEO पाहाल तर तुम्ही चेहऱ्यावरील मास्क कधीच हटवणार नाहीत

कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी मास्क (mask) वापरण्यावर भर दिला जातो आहे, मात्र कित्येकांना अजूनही त्याचं महत्त्व पटलेलं नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 जुलै : कोरोनाव्हायरसापासून (coronavirus) बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे हे मास्क (mask) वापरणं. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तरी कित्येक जण मास्क न घालताच फिरताना दिसताच इतकंच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनादेखील मास्कचं महत्त्व समजलं नाही. मात्र तुम्ही अशी चूक करू नका. तुम्ही जर मास्क घातला नाही तर काय होऊ शकतं, हे दाखवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो तुम्ही पाहाल तर तुमच्या तोंडावरील मास्क कधीच हटवणार नाहीत. आतापर्यंत मास्क कसा वापरावा, मास्क घालण्याची आणि काढण्याची योग्य पद्धत, मास्क निर्जंतुक कसा करावा, तो पुन्हा वापरताना काय काळजी घ्यावी असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिलेत. मात्र मास्क घातला नाही तर काय होऊ शकतं, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मास्क घातल्यानंतर आणि मास्क न घालता काय होऊ शकतं, यामध्ये फरक दाखवणारा हा व्हिडीओ आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडीओत आपण पाहू शकतो सुरुवातीला व्यक्ती मास्क न घालता फक्त जोरात बोलते, त्यावेळी तिच्या तोंडातून किती ड्रापलेट्स निघतात. हे ड्रॉपलेट्स एका विशिष्ट प्रकाशात स्पष्ट दिसून येतात. उघड्या डोळ्यांनी ते आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. फक्त एखादी व्यक्ती बोलताना इतके ड्रॉपलेट्स तिच्या तोंडातून निघत असतील मग ती शिंकताना आणि खोकताना किती असतील याची कल्पना आपण करूच शकतो. हीच व्यक्ती नंतर जेव्हा मास्क घालते तेव्हा आपण पाहू शकतो की तिच्या तोंडातून ड्रापलेट्स मास्कमधून बाहेर येत नाहीत. हे वाचा -  हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव सध्या लोक सर्जिकल किंवा घरगुती बनवलेलं कापडी मास्कही वापरत आहेत. असे वेगवेगळे मास्क घातल्याने काय फरक पडू शकतो हेदेखील या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. सर्वसामान्य मास्क आणि कापडी मास्कमध्ये फारसा फरक नाही. मास्क कोणताही असला तरी ड्रॉपलेट्स हवेत पसरण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे मास्क कोणताही असो तो घालणं महत्त्वाचं आहे हे यातून दिसून येतं. शिवाय काही लोकांना मास्क घालण्याची योग्य पद्धत माहिती नाही. मास्क घातला तरी त्यातून ड्रॉपलेट्स बाहेर येऊ शकतात जर तो मास्क योग्यप्रकारे घातला नसेल तर त्यामुळे मास्क कसा घालावा हेदेखील या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. हे वाचा -  हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास ‘फिल्टर’ आपल्याला खोकला, सर्दी नाही त्यामुळे आपल्याला मास्क घालण्याची गरज नाही असं अनेकांना वाटतं. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हवेतूनही पसरू शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती फक्त शिंकताना, खोकताना तोंडातून बाहेर येणाऱ्या थेंबावाटेच नव्हे तर संक्रमित व्यक्ती बोलताना, तसंच तिच्या श्वासोच्छवासामार्फतही व्हायरस हवेत पसरू शकतात आणि हे व्हायरस बराच काळ हवेत राहू शकतात. त्यामुळे अशी व्यक्ती आणि अशा हवेच्या संपर्कात आल्यास कोरोनाव्हायरसचा धोका आहे. त्यामुळे संक्रमित आणि निरोगी अशा प्रत्येक व्यक्तीने मास्क घालणं गरजेचं आहे. संक्रमित व्यक्तीने मास्क घातल्याने संक्रमण पसरण्याचा धोका कमी होतो तर निरोगी व्यक्तीने मास्क घातल्याने त्याला संक्रमण होण्याचा धोका कमी होतो. हे वाचा -  पहिल्यांदाच एका दिवसात झाल्या 2.5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या त्यामुळे किमान हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही तरी आता मास्क घाला आणि तुमच्या आसपासच्या ज्या व्यक्ती मास्क घालत नाहीत त्यांना ही बातमी नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मास्कचं महत्त्व पटेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या