JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लठ्ठपणाचा प्रेग्नन्सीवर कसा परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितला निरोगी गर्भधारणेचा मार्ग

लठ्ठपणाचा प्रेग्नन्सीवर कसा परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितला निरोगी गर्भधारणेचा मार्ग

लठ्ठपणाचे गर्भवती महिलेच्या शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. बेंगळुरू येथील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील लीड कन्सल्टंट, ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. एन. सपना लुल्ला यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 मार्च : एखादी महिला गर्भवती राहिली की आता तू दोन जीवांची आहेस, पोटातल्या बाळासाठी तुला जास्त खायला हवं, असा सल्ला तिला घरातली मंडळी देत असतात. याचा उद्देश बाळाला हवं असलेलं संपूर्ण पोषण मिळावं आणि गर्भवती महिलेचं अपेक्षित असलेलं वजन वाढावं, हा असतो. बऱ्याचदा दोघांसाठी खाल्ल्याने गर्भवती महिलांचे वजन खूप जास्त वाढते आणि त्यामुळे लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. मात्र या लठ्ठपणाचे गर्भवती महिलेच्या शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात. बेंगळुरू येथील अॅस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील लीड कन्सल्टंट, ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. एन. सपना लुल्ला यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, ती जाणून घेऊयात. लठ्ठपणा अर्थात ओबेसिटी म्हणजे काय? ओबेसिटी ही एक अशी कॉम्लेक्स डिसऑर्डर आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरात जास्त चरबी निर्माण होते. हा एखाद्याच्या बॉडी मास इंडेक्स (BMI) च्या आधारे मोजला जातो. साधारणपणे, 25 ते 29.8 मधील बीएमआय असलेल्या लोकांचं वजन जास्त मानलं जातं. तर बीएमआय 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले लोक लठ्ठ मानले जातात. ओबेसिटी तीन कॅटेगरीत मोजली जाते. ती वाढता बीएमआय व हेल्थ रिस्क दर्शवते. यामध्ये 1. कॅटेगरी I ओबेसिटी: BMI 30-34.9 2. कॅटेगरी II ओबेसिटी: BMI 35-39.9 3. कॅटेगरी III ओबेसिटी: BMI 40 किंवा त्याहून अधिक. ओबेसिटी गर्भधारणेवर कसा परिणाम करू शकते? गर्भधारणेदरम्यान लठ्ठपणा ही सर्वांत सामान्य समस्यांपैकी एक आहे. बहुतांश मातांना याचा सामना करावा लागतो. यामुळे गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोकाही वाढतो. बीएमआय वाढलेल्या स्त्रियांना लठ्ठपणामुळे खालील आरोग्य समस्या उद्भवतात- 1. गर्भधारणेतील हायपर टेन्शन : ओबेसिटीमुळे गर्भवती महिलांचं ब्लड प्रेशर वाढतं. हे दुसऱ्या तिमाहीत विकसित होतं आणि आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण करतं. 2. प्री-अॅक्लॅम्पसिया : अशा प्रकारचे हायपर टेन्शन गर्भधारणेच्या दुसऱ्या सहामाहीत किंवा प्रसूतीनंतर लगेचच विकसित होतं. यामुळे लठ्ठ स्त्रियांची किडनी व लिव्हर फेल्युअर होऊ शकते. काही वेळा हार्ट अटॅक आणि स्ट्रोकही होऊ शकतो. या शिवाय गर्भाच्या वाढीवर परिणाम आणि प्लेसेंटाच्या समस्याही होऊ शकतात. 3. मॅक्रोसोमिया : या स्थितीत गर्भ नेहमीपेक्षा मोठा असतो, ज्यामुळे प्रसूतीदरम्यान जखमा होतात. 4. गर्भावस्थेतील डायबेटिस : गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने अनेकदा अधिक वजनाची बाळं जन्मतात. त्यामुळे अनेक मातांची सिझेरियन प्रसूती करावी लागते. गर्भावस्थेत डायबेटिसचं निदान झालेल्या स्त्रियांना नंतर डायबेटिस होण्याचा धोका असतो, जो नंतर मुलांनाही होऊ शकतो. 5. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनिया : या स्थितीत गर्भवती महिला झोपेत असताना श्वासोच्छवास थोडक्यात थांबतो. यामुळे महिलांना अधिक थकवा जाणवू शकतो. तसेच प्री-अॅक्लॅम्पसिया, हाय ब्लड प्रेशर, हार्ट व फुफ्फुसाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. 6. जन्म दोष : लठ्ठ गर्भवती महिलांच्या मुलांना न्यूरल ट्यूब डिफेक्ट व हार्ट डिफेक्टसारखे जन्मजात दोष होऊ शकतात. 7. बाळांच्या तपासणीत समस्या : अल्ट्रासाउंड तपासणीदरम्यान शरीरातील अतिरिक्त चरबी गर्भाच्या तपासणीत अडथळा आणू शकते. परिणामी, प्रसूतीदरम्यान गर्भाच्या हृदयगतीचं निरीक्षण करणं आव्हानात्मक होऊ शकतं. निरोगी गर्भधारणेसाठी काय करायला हवं? लठ्ठ महिला धोके असूनही निरोगी गर्भधारणा करू शकतात. त्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी. ● वजन कमी करण्यासाठी रोज किमान 30 मिनिटं पोहणं, चालणं यासारखे व्यायाम करा. ● निरोगी आहार घ्या. आहारात कमी कार्बोहायड्रेट आणि हाय फॅट प्रोटीन फूडचा समावेश करा. ● भाताचं सेवन कमी करा. ● साखरेचं सेवन कमी करून नैसर्गिक गोड पदार्थ व पेय घ्या. महत्त्वाचं म्हणजे लठ्ठ महिलांनी प्रसूतीतज्ञांशी नियमित सल्लामसलत केल्याने धोके कमी होऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या