JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इन्स्टाग्रामवरून कसे कमावले जातात पैसे? या स्टार्सची आहे कोट्यवधींची कमाई

इन्स्टाग्रामवरून कसे कमावले जातात पैसे? या स्टार्सची आहे कोट्यवधींची कमाई

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बऱ्याच जणांसाठी कमाईचे साधन बनले आहेत. इन्स्टाग्राम देखील यातील महत्त्वाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जुलै : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा (Social Media Platform) वापर आजकाल विविध कारणांसाठी करण्यात येतो. यावर तुम्ही तुमची मतं मांडू शकता किंवा तुमची कला देखील सादर करू शकता. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर बऱ्याच जणांसाठी कमाईचे साधन बनले आहेत. इन्स्टाग्राम (Instagram) देखील यातील महत्त्वाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. काही सेलिब्रिटींसाठी इन्स्टाग्राम केवळ मत  मांडण्यासाठीचे  व्यासपीठ नसून यातून त्यांची भरभक्कम कमाई देखील होते. इ्न्स्टाग्राम रिच लिस्टवरून (Instagram Rich List 2020) याबाबत माहिती मिळते. या यादीमध्ये त्या सेलिब्रिटींची नावं असतात ते इन्स्टाच्या माध्यमातून कोट्यवधी कमावतात. इन्स्टाग्राम रिच लिस्ट 2020 तील पहिल्या 10 मध्ये कोणत्याही भारतीय सेलिब्रिटीचे नाव नाही आहे, मात्र क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) 26व्या तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) 28व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर अमेरिकन कॅनडियन अभिनेता ड्वेन जॉनसन आहे. तो एका पोस्टच्या माध्यमातून जवळपास 7.6 कोटी रुपये कमावतो. (हे वाचा- एका भारतीयाचा भन्नाट अनुभव; फक्त एकट्यासाठी फ्रँकफर्टहून सिंगापूरसाठी उडलं विमान ) विराटचे इन्स्टाग्रामवर 64.2 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तो एका पोस्टमधून जवळपास 2.21 कोटी रुपये कमावतो. प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर 54.3 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ती जवळपास 2.18 कोटी रुपये प्रत्येक पोस्टसाठी कमावते.

आता विराट कोहलीचे 64 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जर त्याने इन्स्टाग्रामवर कोणत्या प्रोडक्टचा प्रचार केला तर ते प्रोडक्ट थेट 64 मिलियन लोकांपर्यंत पोहोचेल. एकप्रकारची ही जाहिरात आहे. ज्यामध्ये ते उत्पादन खरेदी किंवा ग्राहकांच्या पसंतीस उतरावे याकरता सेलिब्रिटी इंफ्लूएन्सरचे काम करतात. याप्रकाराला Influencer marketing असे म्हणतात. ज्यामध्ये फीचर्स पोस्टचे पैसे मिळतात.  इन्स्टाग्राम यामध्ये सेलिब्रिटींना पैसे देत नाही तर त्या बँडकडून पैसे दिले जातात ज्याला हे  सेलिब्रिटी प्रमोट करत आहेत.

इन्स्टाग्रामवर प्रमोशनची  विशेष बाब म्हणजे ते एकदम नैसर्गिक वाटते. म्हणजे टीव्हीवर तुम्ही ज्या जाहिराती पाहता, तेव्हा तुम्हाला माहित असते की त्या जाहिराती आहेत. मात्र इन्स्टाग्रामवर एखाद्या सेलिब्रिटीने पोस्ट केल्यास ती जाहिरात न वाटता केवळ एक सोशल मीडिया पोस्ट वाटते. त्याचप्रमाणे त्यांच्या फॉलोअर्सना असे देखील वाटते की, सेलिब्रिटी हे प्रोडक्ट वापरत आहेत, म्हणजे त्यामध्ये काहीतरी खास असणार. (हे वाचा- FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खूशखबर! 31 जुलैपर्यंत नाही कापला जाणार ‘हा’ कर ) फक्त सेलिब्रिटी नाही तर सामान्य माणसं देखील इन्स्टाग्रामवर पैसे कमावू शकतात. तुमचे किती फॉलोअर्स आहेत यावर हे अवलंबून आहे. त्याचप्रमाणे कोणाचे प्रमोशन करता येईल हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ही पूर्मपणे एक व्यावसायिक रणनिती आहे. इन्स्टावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी उत्तम कंटेट, योग्य हॅशटॅग्स, चांगले फोटो किंवा व्हिडीओ या सर्व गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. इ्न्स्टावर असणाऱ्या खास थीम्स, फिल्टर याबाबत देखील तुम्हाला ज्ञान असणे गरजेचे आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या